पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये दर

पंढरपूरबाजार समितीमध्ये बेदाण्याला नुकताच (ता. २४) उच्चांकी ३०५ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला. तर सरासरी १७५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये दर
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये दर

सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बेदाण्याची आवक आणि दरामध्ये चांगलाच चढ-उतार सुरू आहे. बेदाण्याला नुकताच (ता. २४) उच्चांकी ३०५ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला. तर सरासरी १७५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.  पंढरपुरात या दिवशी बेदाण्याची सुमारे १५० गाड्यांची आवक होऊन १३१ गाड्या बेदाण्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे व उपसभापती विवेक कचरे यांनी दिली. सभापती श्री. घाडगे म्हणाले, सध्या बेदाणा आवक चांगली असून, खरेदीदार व्यापारी मोठ्या संख्येने येत आहेत. मंगळवारी करकंब येथील उत्पादकाच्या ५० बॉक्स बेदाण्यास ३०५ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला.  बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बेदाण्याचे सौदे दर मंगळवार आणि शनिवारी दुपारी १२ वाजता होत असतात. मालाला उठाव व मागणी चांगली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी न करता फक्त अडते व व्यापारी शारीरिक अंतर पाळून माल विक्री करतात. या वेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, संचालक शैलेंद्र नवाळे, सिकंदर बागवान आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.