मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय जावंधिया

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात डॉलर स्वरूपात आलेली वृद्धी आणि रुपयाचे अवमूल्यन ही दोन कारणे लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय जावंधिया Reasons for the rise in mustard Different: Vijay Jawandhiya
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय जावंधिया Reasons for the rise in mustard Different: Vijay Jawandhiya

नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर मिळत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केला होता. मात्र त्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात डॉलर स्वरूपात आलेली वृद्धी आणि रुपयाचे अवमूल्यन ही दोन कारणे लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मोहरीला हमीभाव ४६५० च्या तुलनेत ७००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यामागील कारणांचा खुलासा त्यांनी केला नाही. गेल्या वर्षी बाजारात मोहरी तेलाचे भाव ११० ते १२० रुपये प्रति किलो होते. या वर्षी तेच दर १७० ते दोनशे वीस रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आपण खाद्य तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकलो नाही. भारतात देखील पावसामुळे सोयाबीन उत्पादक प्रभावित झाली होती. त्याचवेळी जागतिक बाजारातून खाद्यतेल तसेच सोयाबीन खरेदीत चीनकडून वाढ करण्यात आली. या सर्वांचा परिणामी जागतिक बाजारात दरात वाढ होणे स्वाभाविक होते. अमेरिकन बाजारात गेल्यावर्षी सोयाबीनचे दर सात ते आठ डॉलर प्रति बुशेल होते. या वर्षी त्यात दुपटीने वाढ होत ते दर १४ ते १५ डॉलर प्रति बुशेल (एक बुशेल म्हणजे २७ किलो) झाले आहेत. सोयाबीन तेलाचे दर मार्च २०२० मध्ये ६१४ डॉलर प्रति टन होते. ते आज १२७९ डॉलर प्रति टन झाले आहेत. सूर्यफूल तेलाचे दर वर्षभर आधी ६५६ डॉलर प्रति टन होते. ते आज १५८० डॉलर प्रति टन झाले आहेत. त्यासोबतच पाम तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. आपण सत्तेत आला त्या वेळी एका डॉलरचा विनिमय दर ६० रुपये होता. आज तो ७३ रुपयांवर पोहोचला आहे. असेही जावंधिया यांनी पत्रातून दाखवून दिले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com