सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर तेजीतच राहण्याची शक्यता

ल्या सप्ताहात देशांतर्गत बाजारात दरात ५०० ते ७०० रुपयांची सुधारणा होऊन दर ९००० ते १०५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर तेजीतच राहण्याची शक्यता
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर तेजीतच राहण्याची शक्यता

पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली. पेरणीला विलंब झाल्याने आवक हंगामाला होणार उशीर आणि नगण्य साठा या पार्श्‍वभूमीवर सोयाबीनचे दर देशांतर्गत बाजारात वाढत आहेत. सोयापेंड आयातीचा बाजारावरील परिणाम कमी झाला आहे. गेल्या सप्ताहात देशांतर्गत बाजारात दरात ५०० ते ७०० रुपयांची सुधारणा होऊन दर ९००० ते १०५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सरकारने ऑगस्ट महिन्यात जनुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर सोयाबीन बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र देशांतर्गत बाजारातील तुटवडा आणि लांबलेला आवक हंगाम यामुळे दराने पुन्हा उसळी घेतली. एक ऑक्टोबरपासून सुरू होणार हंगाम यंदा किमान १५ दिवस दिवस लांबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी अंदाजे २ ते ३ लाख टनांपर्यंत शिल्लक साठा राहत होता. यंदा मात्र नगण्य सोयाबीन शिल्लक असल्याचे बाजारातील जाणकार सांगतात. त्यामुळे स्टॅाकिस्ट साथ सांभाळूनच सोयाबीनची विक्री करत आहेत. सोयाबीन प्रक्रियादार प्लांट्समध्ये मागणी सुरू झाली आहे. त्यातच मध्य प्रदेशात नगण्य आवक सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता पुढील आठवड्यात नवीन सोयाबीन तुरळक ठिकाणी बाजारात येण्याची शक्यता इंदूर येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील आठवड्यात जागतिक बाजारात सोयाबीन दरात तेजी-मंदीचे वातावरण होते. सट्टेबाजांच्या हजेरीने बाजारात उत्साह निर्माण झाला होता. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीन दरात ५०० ते ७०० रुपयांनी सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे दर तेजीतच राहण्याची शक्यता  

 • परवानगी मिळालेली सोयापेंड लगेच येण्याची शक्यता नाही
 • देशांतर्गत हंगाम किमान १५ दिवस उशिरा सुरू होणार
 • देशात शिल्लक सोयाबीन नगण्य
 • प्रक्रिया प्लांट सुरू करण्यासाठी मागणी
 • सट्टेबाज सक्रिय झाल्याची शक्यता
 • पुन्हा गाठली दहा हजारी महिन्यात सरकारने १२ लाख टन जनुकीय सुधारित सोयापेंडच्या आयातीला परवानगी दिल्याने सोयाबीनचा कमाल दर आठ हजारांवर येऊन ठेवला होता. परंतु पुन्हा दर सुधारले असून राजस्थानमध्ये १०५०० रुपयांपर्यंत मजल मारली. गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात ५०० ते ७०० रुपयांनी सुधारणा झाली. तर प्लांट दरात ८०० ते १५०० रुपयांपर्यंत दर वाढले. मागील आठवड्यात मध्य प्रदेशात ९२०० ते ९७०० रुपये दर होते. तर महाराष्ट्रात ९००० ते ९५०० रुपये आणि राजस्थानात ९७०० ते १०५०० रुपयांपर्यंत दर सोयाबीनला मिळाले.  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com