सोयाबीनमधील तेजी कायम 

आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील बाजार समित्यांत सोयाबीन दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतुकीतील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने सोयाबीन आयात घटली आहे.
Soybean boom continues
Soybean boom continues

पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील बाजार समित्यांत सोयाबीन दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतुकीतील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने सोयाबीन आयात घटली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोयाबीन काहीशी घसरले मात्र फंडामेन्टल्स तेजीला पूरक असल्याचे जाणकारांनी सांगितले.  देशभरातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात सोयाबीनची आवक कमी असून मागणी मात्र वाढत असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी लातूर बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ५५५० तर अकोला बाजार समितीत ५४०० रुपये दर मिळाला. हिंगोलीत सरासरी ५३०० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. तर इंदोर बाजार समितीत ५४५० रुपये सरासरी दर मिळाला. शनिवारच्या तुलनेत देशातील जवळपास सर्वंच बाजार समित्यांत १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली आहे.  चीनची आयात घटली  चीनची सोयाबीन आयात ऑक्टोबर महिन्यात ४१.२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मार्च २०२० नंतर ऑक्टोबरमध्ये चीनने सर्वांत कमी आयात केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतुकीतील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने चीनमधून सोयाबीनला कमी मागणी येत आहे. चीनने ऑक्टोबर महिन्यात ५१.१ लाख टन सोयाबीन आयात केली. तर त्याआधी ८६.९ लाख टन आयात केली होती. तर सप्टेंबर महिन्यात ६८.८ लाख टन सोयाबीनची आयात झाली होती. चीनने ऑक्टोबरपर्यंत यंदा ७९०.८ लाख टन सोयाबीनची आयात केली आहे. ही आयात मागील वर्षी याच काळात झालेल्या आयातीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी कमी आहे. चीनमध्ये कोरोनानंतर वराहपालन उद्योग वाढत असताना सोयापेंडला चांगली मागणी राहील, असे गृहित धरून येथील प्रक्रिया उद्योगाने सुरुवातील मोठी खरेदी केली. सोयाबीन प्रक्रिया मार्जिनमध्ये जून महिन्यात घसरण झाल्यानंतर स्पटेंबर महिन्यात मार्जिन निगेटिव्ह झाले होते. त्यानंतर स्टॉक कमी झाल्याने मार्जिन वाढले.  सीबॉटवरील दर  आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोयाबीन दरात काहीशी घसरण झाली. मात्र सध्याची परिस्थिती दरवाढीला पूरक असल्याचे जाणकारांनी सांगितले. सोमवारी पाच सत्रांत पहिल्यांदा दर कमी झाले. सोयाबीन फंडामेंटल्स सध्या तेजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे दरात झालेली घसरण जास्त काळ टिकाणार नाही, जाणकारांनी सांगितले. सोमवारी सीबॉटवर जानेवारी २०२२चे करार १२.४० डॉलर प्रति बुशेल्सनी झाले आहेत.  प्रतिक्रिया 

वाशीम बाजार समितीत सोयाबीनला किमान ४५०० रुपये आणि कमाल ६३०० रुपये दर मिळाला. बाजारात दिवाळीनंतर केवळ एक ते दीड हजार पोत्यांनी आवक सुधारली आहे. सध्या बाजारात सात हजार पोत्यांची आवक होत आहे.  - हरिओम भोयर, सोयाबीन व्यापारी, वाशीम   

बाजारात अपेक्षेप्रमाणे आवक वाढली नाही. आवकेत किरकोळ वाढ झाली आहे. लातूर बाजार समितीत सोमवारी ३० हजार पोत्यांच्या दरम्यान आवक झाली. तर सरासरी दर ५५०० रुपये मिळाला.  - अशोक अगरवाल, सोयाबीन व्यापारी, लातूर   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com