बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढ

जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली वाढ ही गुंतणूकदारांच्या टेक्याने नाही तर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनामुळे झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
Soybean price rise due to market imbalance
Soybean price rise due to market imbalance

पुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली वाढ ही गुंतणूकदारांच्या टेक्याने नाही तर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनामुळे झाल्याचे जाणकारांनी सांगितले. तसेच सोयाबीन, मका आणि गहू बाजारातील फंडामेन्टल्स दरवाढीला पूरक असल्याचंही प्रक्रिया उद्योगातील जाणकारांनी जिनिव्हा येथील परिषदेमध्ये सांगितले. 

शेतीमालाच्या दरात झालेल्या वाढीसाठी व्यापारातील गुंतवणूकदार जबाबदार नाहीत, तर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यातील मूलभूत घटक म्हणजेच फंडामेन्टल्समधील असंतुलन जबाबदार आहे, असे जिनिव्हा येथे झालेल्या ग्लोबल ग्रेन्स कॉन्फरन्समध्ये कृषी उद्योगातील जाणकारांनी सांगितले. शेतीमालाला व्यापारी, ग्राहक आणि सरकारांकडून मागणी वाढली त्यामुळे दरवाढीत मोठी आर्थिक गुंतवणूक झाल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला. अनिश्‍चित काळासाठी मागणी वाढल्याने दरवाढीला बळ मिळाले. त्याचा परिणाम म्हणून सध्या मका, गहू आणि सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे. 

युक्रेनच्या कृषी विभागाचे उपमंत्री तारस कचका म्हणाले, की सध्या शेतीमालाच्या दरात झालेली वाढ ही अनेक वर्षांतील उच्चांकी आहे. ही दराची स्थिती म्हणजे बाजारातील नवीन स्केल म्हणता येईल. परंतु मका, सोयाबीन आणि गहू दरातील ही वाढ शाश्‍वत नाही. 

कोरोना काळात व्यापार विस्कळीत कोरोना काळात शेतीमालाची मागणी वाढली आणि लॉजिस्टिक सुविधा विस्कळीत झाली. त्यामुळे एकीकडे मागणी वाढत गेली, मात्र निर्यात प्रभावित झाल्याने पुरवठा कमी राहिला. त्यातच ब्राझीलच्या मका उत्पादनात २० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली. येथे मक्याच्या उत्पादनात आणि काढणीत घट होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेत दुष्काळी स्थितीमुळे गव्हाच्या उत्पादनात घट होणार आहे. तर पूर्व युरोप आणि ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या पावसाने पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे गव्हाच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मका गहू आणि सोयाबीनचे दर जागतिक सर्वच वायदे बाजारांत वाढले आहेत. महत्त्वाच्या शिकागो वायद्यांमध्ये चीनची मागणी आणि वातावरणातील बदलाच्या भीतीमुळे सुधारणा झाली आहे. त्यातच इंधन आणि गॅसच्या दरात सुधारणा झाल्याने कृषी निविष्ठांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मका, गहू आणि सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.

गुंतवणूकदारांमध्ये दरात मोठी वाढ होऊन सुपरसायकल तयार होण्यास पूरक फंडामेन्टल्स सध्या तरी दिसत नाहीत. परंतु येणाऱ्या काळात मका, सोयाबीन आणि गव्हाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बाजारात अद्यापही मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनाची स्थिती उद्‍भवत आहे. शेतीमालाच्या दरवाढीमागे कोरोना महामारी, मागणीत अतिवाढ, काही देशांत पीक काढणी न होणे आणि पिकांची घटलेली गुणवत्ता ही दरवाढीमागील महत्त्वाची मूलभूत कारणे आहेत.  - केसेनिया बोलोमाटोवा, रशिया

चीनची सोयाबीन मागणी बदलली आहे. चीनच्या मागणीमुळे जगाची मागणी बदलते. जेव्हा चीनने साठा वाढविण्यासाठी ३० दशलक्ष टन मक्याची आयात केल्यानंतर सर्व बाजार बदलला. यामुळे दर वाढले, मात्र चीनची ही गुंतवणूक शाश्‍वत नसून दरवाढही दीर्घकालीन नाही.  - यवेस पाचे, सोयाबीन ट्रेड हाउस, स्वित्झर्लंड  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com