हळदीची आवक वाढू लागली 

बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू लागली आहे. सांगलीत सकाळी राजापुरी, तर सायंकाळी परपेठ हळदीचे सौदे सुरू झाले आहे.
turmeric
turmeric

सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू लागली आहे. सांगलीत सकाळी राजापुरी, तर सायंकाळी परपेठ हळदीचे सौदे सुरू झाले आहे. सध्या दर काहीसे कमी झाले असले, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड ते दोन हजारांनी सुधारलेले आहेत. पुढील काही दिवस हळदीची आवक आणि दर स्थिर राहतील, दरात फारसे चढ-उतार होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

सांगली बाजार समितीत जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातून हळदीची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे निजामाबाद, सदाशिवपेठ, नांदेड वसमत या ठिकाणांहून हळद सौद्यासाठी येऊ लागली आहे. त्यामुळे स्थानिक म्हणजे राजापुरी हळदीचे सौदे सकाळी निघतात. तर महाराष्ट्रातील सांगली सोडून इतर जिल्ह्यांसह परराज्यांतील हळदीची आवक होऊ लागल्याने परपेठ या हळदीचे सौदे सायंकाळी होतात. वास्तविक पाहता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवसातून दोन वेळा सौदे सुरू झाले. परिणामी, हळदीच्या आवकीत वाढ झाली.  गेल्या तीन दिवसांपासून दररोज स्थानिक हळदीची ५५ ते ६० हजार क्विंटल, तर परपेठ हळदीची ७ ते ११ हजार क्विंटल अशी ६० ते ७० हजार क्विंटल आवक होत आहे. हळदीच्या आवकीत वाढ झाली असल्याने गेल्या आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात दरात काहीशी घसरण झाली आहे. मात्र,सध्याची हळदीची आवक पाहता, हळदीच्या दरात चढ-उतार होण्याची फारशी शक्यता नसून दर स्थिर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.  हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये सध्या एक दिवस आड हळदीची आवक घेण्यात येत आहे. मंगळवारी हळदीची ६५० क्विंटल आवक झाली होती. तर वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीची काही प्रमाण आवक सुरू झाली आहे. मंगळवारी वसमतमध्ये २००० क्विंटल हळदीची आवक होती.  सांगली बाजार समितीतील हळदीचे दर (रुपये/क्विंटल) 

प्रकार १६ फेब्रुवारी ९ फेब्रुवारी 
सेलम कणी ७८०० ते ८५०० ८८०० ते ९३०० 
मध्यम ८५०० ते ८८०० ९८०० ते १०५०० 
उच्च लगडी १२५०० ते १३०० १२५०० ते १४५०० 

महत्त्वाच्या बाजारांतील दर (रुपये/क्विंटल)

बाजार किमान कमाल सरासरी 
हिंगोली ८०५० ८७५० ८४०० 
वसमत ७००० ९५०० ८२५० 

प्रतिक्रिया गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या दरात दीड ते दोन हजारांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी कृत्रिम दराच्या तेजीला बळी न पडता, योग्य विचार करून योग्य बाजारपेठेत हळदीची विक्री करावी.  - हार्दिक सारडा, ह ळद व्यापारी, सांगली  हळदीच्या दर्जावर दर मिळत आहेत. त्यामुळे दर्जा ठेवून हळदीचे उत्पादन घेत असल्याने चांगले दर मिळतात. शेवटी दर हे आवकेवर अवलंबून असल्याने दरात चढ उतार होतो. गेल्या आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात दरात घसरण झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर चांगले असल्याने फायदेशीर आहेत.  - मयूर पावणे, हळद उत्पादक, कालवडे, ता. कराड 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com