हळद दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडे

लांबलेला पावसाळा, त्यामुळे शिवारात साचलेले पाणी परिणामी हळदीमध्ये कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यात हळदीच्या उत्पादकतेत १५ ते २० टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हळद दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडे
Turmeric rate movement To ten thousand rupees

नागपूर : लांबलेला पावसाळा, त्यामुळे शिवारात साचलेले पाणी परिणामी हळदीमध्ये कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यात हळदीच्या उत्पादकतेत १५ ते २० टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याच कारणामुळे हळदीच्या दरात तेजी अनुभवली जात असून, ७५०० ते ९२०० रुपयांपर्यंत हळदीचे दर पोहोचले आहेत. 

यंदाच्या हंगामात पावसाळा लांबल्याने उत्पादकतेत मात्र घट होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. सातारा, सांगली या भागांतील हळद फेब्रुवारीपर्यंत निघून जाते. विदर्भ, मराठवाड्यात हळदीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या भागात लागवड होते. त्यानंतर मार्च महिन्यापासून काढणीचा हंगाम सुरू होतो. उन्हाळ्यात हळदीला पाण्याची गरज राहत नाही. 

 या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत पाऊस थांबणे अपेक्षित होते. परंतु पावसाची संततधार असल्यामुळे मातीत ओलावा कायम राहिला. लागवडीनंतर चार, साडेचार महिन्यांत हळदीला मातीची भर घातली जाते. या वेळी भर घातल्यानंतर पुन्हा पाऊस आला. त्याच्या परिणामी माती आवळून आली. त्यामुळे कंदकुज, करपा आणि हळदीची फुगवण व्यवस्थित न होणे असे प्रकार समोर आले. त्याचा फटका बसत जमिनीच्या प्रकारानुसार उत्पादकता प्रभावित झाली आहे.

सरासरी उत्पादकता घट होण्याचा विचार केल्यास एकरी १५ ते २० टक्के उत्पादन घटेल, अशी शक्यता आहे, असे हळद तज्ज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी सांगितले. उत्पादकता कमी होण्याच्या शक्यतेने बाजारात हळदीच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी दोन हजार रुपयांनी दरात वाढ झाली आहे.

प्रतिक्रिया  हळदीच्या उत्पादनात पहिल्या वर्षी बेणे खरेदी करावी लागते. त्यामुळे खर्च दीड लाखापर्यंत जातो. त्यानंतर मात्र ७५ ते ८० हजार रुपयांचा खर्च होतो. दर पाच वर्षांनी बेणे बदलावे, अशी शिफारस आहे. शेतकऱ्याने आपसात जरी बेणे बदल केला तरी उद्देश साध्य होतो. या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस होता. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे कंदकूज, करपा आणि हळदीची फुगवण न होणे असे प्रकार घडले आहेत. परिणामी उत्पादकता एकरी १५ ते २० टक्के घटणार आहे.  - डॉ, जितेंद्र कदम, हळद तज्ज्ञ

शिरपूर भागात तीन हजार एकरांवर गेल्या अनेक वर्षांपासून हळद लागवड होते. शेतकऱ्यांनी व्यवस्थापन पद्धतीत सातत्याने बदल केले आहेत. त्यामुळे उत्पादकता वाढ होत गेली. एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. या वर्षी पाऊस लांबल्याने दहा टक्के घट होण्याची शक्यता आहे. ​एकरी अडीच ते तीन क्विंटल घट होईल.  - डॉ. गजानन ढवळे, हळद उत्पादक शेतकरी, शिरपूर (जैन), ता. मालेगाव, वाशीम माझी साडेतीन एकरांवर हळद लागवड आहे. या वर्षी पाऊस जास्त झाला असला तरी जमीन पाण्याचा निचरा होणारी असल्याने माझ्या शिवारातील पीक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे उत्पादकता कमी होणार नाही असे वाटते. दरातील तेजी सुखावणारी आहे.   - स्वप्नील कोकाटे,  हळद उत्पादक, शिर्ला, ता. पातुर, जि. अकोला

वसमत बाजार समितीत जानेवारी महिन्यात रोज सरासरी चार हजार ते साडेचार हजार पोत्यांची आवक होते. या वर्षी मात्र उत्पादकता घटल्याने आवक दोन हजार पोत्यांवर आली आहे. त्यामुळे दरात तेजी अनुभवली जात असून, ७००० ते ९२०० पर्यंत दर पोहोचले आहेत. बाजार समितीत १२ व्यापारी, तसेच १५० अडते आहेत. एका व्यापाऱ्याकडून रोज दोन हजार पोत्यांची मागणी राहते. ही मागणी पूर्ण होत नसल्यामुळे येत्या काळात हळदीचे दर दहा हजार रुपयांपर्यंत जातील. - दत्ता कदम,  संचालक, पाताळेश्‍वर ट्रेडिंग कंपनी, वसमत, जि. हिंगोली 

वायदे बाजारात हळद आताच सहा हजार रुपये ट्रेंड करीत आहे. बाजारात देखील व्यवहार ९२०० रुपयांनी होत आहे. त्यामुळे हळद दहा हजारांचा टप्पा गाठून त्यापेक्षा अधिक तेजी येईल. - राहुल जैन, व्यापारी, कोटा बाजार समिती, राजस्थान - हळदीच्या गतवर्षीच्या दराशी तुलना  २०२०- २१ : ५००० ते ७००० २०२१-२२ : ७५०० ते ९२००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.