आंध्रप्रदेशात पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

२०२१ च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीने पिडीत १६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून २९७७ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
आंध्रप्रदेशात पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
YSR Free Crop InsuranceAgrowon

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी यांनी बुधवारी (१५ जून) मोफत पीक विमा योजनेचे पैसे जमा केल्याची घोषणा केली. २०२१ च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. श्री सत्यसाई जिल्ह्यातील कोठापल्ली गावात रेड्डी यांनी प्रतिकात्मक धनादेश देऊन रेड्डी यांनी घोषणा केली.

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी मोफत पीकविमा योजना राबवण्यात येते. या योजनेत शेतकऱ्यांचा प्रीमियम राज्य सरकारकडूनच भरण्यात येतो. २०२१ च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीने पिडीत १६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून २९७७ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री रेड्डी यांनी, तेलगू देशम पक्षाचे (TDP) चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या मानसपूत्राला (पवन कल्याण) राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका केली.

तेलगू देश पक्षाची सत्ता असताना पाच वर्षांच्या कार्यकाळात ३० लाख शेतकऱ्यांना ३४११ कोटी रुपयांची रक्कम पिकविम्यापोटी देण्यात आलेली होती. आपण केवळ २०२१ च्या खरीप हंगामातील नुकसानभरपाईपोटी २९७७ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ज्यातील ८८५ कोटी रुपये एकट्या अनंतपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. नायडू आणि त्यांच्या मानसपुत्राला कधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट द्यावीशी वाटत नाही की कधी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावीशी वाटत नाही. त्यामुळे नायडू आता राज्य सरकरांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही जगन मोहन रेड्डी यांनी केला आहे.

आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पीकविमा योजने अंतर्गत ४४.२८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ६६८५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातला एकही पात्र शेतकरी या विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचेही रेड्डी यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com