बहारीनला भारतीय आंब्यांची भुरळ

पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांत पिकणारे ३४ प्रकारचे आंबे बहारीन महोत्सवादरम्यान अल जझीरा ग्रुपच्या सर्व सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
Indian Mango
Indian MangoAgrowon

अपेडाने (APEDA) अल जझीरा ग्रुप आणि भारतीय दूतावासाच्या मदतीने बहारीन येथे आठ दिवसीय आंबा महोत्सव आयोजित केला आहे. १३ जूनपासून हा महोत्सव सुरू झाला आहे.

बहारीनमधील भारताचे राजदूत पियुष श्रीवास्तव यांनी अल जझीरा समूहाचे अध्यक्ष अब्दुल हुसेन खलील दवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंबा महोत्सवाचे उद्घाटन केले. भारतीय आंब्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांत पिकणारे ३४ प्रकारचे आंबे बहारीन महोत्सवादरम्यान अल जझीरा ग्रुपच्या सर्व सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यातील २७ जाती पश्चिम बंगालमधील आहेत तर प्रत्येकी दोन प्रकारचे आंबे बिहार आणि झारखंडचे आहेत.

या महोत्सवात मांडण्यात आलेले आंबे थेट शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO) खरेदी करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमधील भवानी, दौड भोग,आम्रपाली, दिलशाद, चॅटर्जी, द्वारिका, रोगनी, मधू लतिका,रसगुल्ला, बिमली, रतन केवडा, राजभोग, अमृतभोग, लक्ष्मणभोग आदी जातींचे आंबे या महोत्सवात ठेवण्यात आले आहेत.

Indian Mango
प्रतिकूल हवामानामुळे दशेरी आंब्याच्या उत्पादनात घट

तर ओडिशा आणि उत्तर प्रदेशातील बेंगनल्ली, हिमसागर आणि दशहरी या वाणांचे आंबेही महोत्सवात आहेत. बिहारमधील जरदाळू या जीआय मानांकन असलेल्या वाणाचा आंबाही या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बहारीनखेरीज अल जझीरा समूहाच्या हमला, महुझ, झिंग, जुफैर, रिफा, सीफ आदी ठिकाणच्या सुपरमार्केट्समध्ये सर्व प्रकारचे भारतीय आंबे ठेवण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या आंब्यांसोबतच अल जझीरा ग्रुपने त्यांच्या सर्व सुपरमार्केट्समध्ये आंब्याचे केक, ज्यूस, मँगो शेक्स असे विविध पदार्थही ठेवले आहेत.

दरम्यान यापूर्वी भारताबाहेर आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवांत पश्चिम आणि दक्षिण भारतीय राज्यांतील आंब्याचे प्रकार विक्रीसाठी दाखल करण्यात आले होते. आंब्याला भारतात फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांत आंब्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. हापूस, केसर, दशहरी, तोतापुरी आंबे निर्यात केले जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com