Vegan Products: शाकाहारी उत्पादनांसाठी अपेडाचा पुढाकार

या समितीत कृषी शास्त्रज्ञ, निर्यातदारांसह जाणकारांचा समावेश असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. आपल्याला जागतिक बाजारपेठेत चांगल्या दर्जाची शाकाहारी उत्पादने (Vegan Products) निर्यात करावी लागतील.
Vegan Products
Vegan ProductsAgrowon

जागतिक स्तरावर सुरक्षित अन्नाच्या बाबतीत जागरुकता वाढीस लागली आहे. जगभरात वनस्पतिजन्य अन्नपदार्थांना (प्लॅंट बेस्ड फूड) मागणी वाढत आहे. शाकाहरी उत्पादनांच्या (Vegan Products) निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडाने पुढाकार घेतला आहे. शाकाहारी उत्पादनांच्या गुणवत्तेचे निकष ठरवण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.

ही समिती शाकाहारी पदार्थांची गुणवत्ता निर्धारित करणारे निकष, नियमावली ठरवण्याचे काम करणार असल्याचे अपेडाचे महाव्यवस्थापक व्ही.के. विद्यार्थी यांनी सांगितले. बिझनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले.

या समितीत कृषी शास्त्रज्ञ, निर्यातदारांसह जाणकारांचा समावेश असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. आपल्याला जागतिक बाजारपेठेत चांगल्या दर्जाची शाकाहारी उत्पादने (Vegan Products) निर्यात करावी लागतील. विविध देशांची शाकाहारी उत्पादनांची मागणी पूर्ण करण्यासाठी संबंधित देशांचे गुणवत्तेचे निकष, प्रमाणकांचे पालन करावे लागेल. शाकाहारी उत्पादनांच्या खरेदीदार देशांच्या अपेक्षा, गरजांचा विचार करून तशी कृती करण्याची गरज विद्यार्थी यांनी व्यक्त केली.

जागतिक स्तरावर सुरक्षित अन्नाच्या बाबतीत जागरुकता वाढीस लागली आहे. आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याने हे घडत आहे. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात वनस्पतिजन्य अन्नपदार्थांना (प्लॅंट बेस्ड फूड) मागणी आहे. त्यामुळे या संकल्पनेवर भारतात देखील काम व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. देशात प्रोटीन क्‍लस्टर बनविण्यासाठी अपेडा सरकारला शिफारस करणार आहे. शेतीमालाचे मूल्यवर्धन व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे.

शाकाहारी उत्पादनांच्या (Vegan Products) गुणवत्तेचे निकष निर्धारित करण्यासंदर्भात अपेडाने कॅनडा, अमेरिका आणि युरिपियन युनियनमधील अनेक देशांशी अनेकदा संवाद साधलेला आहे. शाकाहारी कृषी उत्पादनांची पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी चांगल्या दर्जाची उत्पादन प्रक्रिया, बारकोडिंग, ट्रेसेबिलिटी सारख्या तंत्राचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे विद्यार्थी म्हणाले.

कोविड महामारीनंतरच्या काळात मांसाहारी पदार्थाना पर्याय म्हणून जगभरातून वनस्पतीजन्य उत्पादनांबाबात जागरूकता वाढली.अमेरिका, युरोप,जपान, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत शाकाहारी आणि वनस्पतीजन्य प्रोटीनयुक्त उत्पादनांना मागणी वाढली. सहकारी अथवा वनस्पतीजन्य उत्पादनांची निर्यात करण्याची मोठी क्षमता भारताकडे आहे. सध्या जरी अशा उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण कमी असले तरीही भारताकडे मोठ्या प्रमाणात शाकाहारी उत्पादन निर्यातीची क्षमता आहे.

शाकाहारी आणि वनस्पतीजन्य उत्पादनांच्या निर्यात नियमनामुळे आंतराराष्ट्रीय बाजारात या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल. भारताच्या एकूण निर्यातीतही भर पडणार असल्याचा विश्वास अपेडाच्या समितीत गुणवत्तेचे निकष निर्धारित करणाऱ्या जाणकारांनी व्यक्त केला.

भारतात प्रोटिनयुक्त वनस्पतीजन्य उत्पादनांचे प्रमाण सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. अर्थात त्याबाबतची जागरूकता वाढत आहे. गुडडॉट, ब्ल्यू ट्राईब आणि शाका हॅरी या कंपन्या माणसाला पर्यायी प्रोटीनयुक्त शाकाहारी उत्पादनांची विक्री करत आहेत. टाटा कन्झ्युमर गुड्स आणि आयटीसी सारख्या इतर अनेक मोठ्या कंपन्यांनीही या क्षेत्रात रस घ्यायला सुरुवात केली.

अपेडा लवकरच वनस्पतीजन्य उत्पादनांच्या प्रसारासाठी त्यांची आंतराराष्ट्रीय प्रदर्शने भरवणार आहे. तसेच देशभरातही विविध ठिकाणी रोड शो, उत्पादक-ग्राहक मेळावे आयोजित करणार असल्याचेही विद्यार्थी यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com