Cotton : आदिलाबाद जिल्ह्यात वाढणार कापसाखालील क्षेत्र

तेलंगणा राज्यात मॉन्सून समाधनकारक असल्याने लागवडीला वेग आला आहे. कापूस, धान यासारख्या पिकांची लागवड अनेक भागांत पूर्णत्वास गेली आहे.
Cotton
CottonAgrowon

नागपूर ः आदिलाबाद जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत धानाचे उत्पादन (Paddy Production) होते. परंतु केंद्र व राज्य सरकारची धान खरेदीबाबत (Paddy Procurement) अनिश्‍चितता तसेच गेल्या हंगामात कापसाला (Cotton Rate) मिळालेला चांगला दर यामुळे राज्यात यंदा कापसाखालील क्षेत्रात (Area Under Cotton) वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे. धान लागवडीसाठी आघाडीवर असलेल्या निर्मल जिल्ह्यातही बहुतांश शेतकऱ्यांची हीच मानसिकता असल्याचे सांगितले जाते.

Cotton
Cotton : शुल्काशिवाय कापूस आयातीला मुदतवाढ

तेलंगणा राज्यात मॉन्सून समाधनकारक असल्याने लागवडीला वेग आला आहे. कापूस, धान यासारख्या पिकांची लागवड अनेक भागांत पूर्णत्वास गेली आहे. परंतु, यंदा तेलंगणातील शेतकऱ्यांची कापसाला सर्वाधिक पसंती आहे. गेल्या हंगामात कापसाचा हमीभाव ६०२५ रुपये असताना खुल्या बाजारात मात्र कापसाचे दर ११ हजारांच्या पुढे गेले होते. त्यामुळे कापसातून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळाला.

यंदा केंद्र सरकारने कापसाला ६३७९ रुपयांचा हमीभाव जाहीर केला असून गेल्यावर्षीच्या हमीभावाच्या तुलनेत ३५४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. निर्मल जिल्ह्याच्या कुंतला मंडळातील पेंचिकलपाड गावात १९४ पैकी १६० शेतकरी धानाऐवजी कापूस किंवा सोयाबीन लागवडीच्या मानसिकतेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या गावातील काहीच शेतकरी धानाची लागवड करतील. त्यामुळेच यंदाच्या हंगामात निर्मल जिल्ह्यात कापूस लागवड क्षेत्र २५ ते ३० टक्‍क्‍यांनी वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे. आदिलाबाद जिल्ह्यात गेल्या हंगामात ३.८५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होती ती यंदा ४.१० लाख हेक्‍टरवर पोहोचेल, असेही सांगितले जाते.

धानाबाबत अनिश्‍चितता

कापसाची किंमत १० हजार रुपयांवर पोहोचली असताना शेतकऱ्यांनी त्यापेक्षा अधिक दर वाढणार नाहीत या शक्‍यतेने व्यापाऱ्यांना आपला कापूस दिला. त्यानंतर दरातील वाढीचा फायदा व्यापाऱ्यांना झाला होता. तरीसुद्धा कापसाने चांगला परतावा दिल्याने शेतकरी समाधानी आहेत. याउलट केंद्र व राज्य सरकारकडून धान खरेदीबाबत अनिश्‍चितता असते, ती या वेळीदेखील कायम राहील आणि परत यंदाही नुकसान सोसावे लागेल, अशा दडपणाखाली शेतकरी आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com