Soybean Market : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन निम्म्यावर

अर्जेंटीनातील ब्यूनस आयर्स ग्रेन्स एक्सचेंजने नुकतेच देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज बदलला. एक्सचेंजच्या मते अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन २५० लाख टनांवर स्थिरावेल.
Soybean Market
Soybean Market Agrowon

Soybean Rate Update : अर्जेंटीनातील सोयाबीन (Argentina soybeans) पिकाला सुरुवातीला दुष्काळाचा फटका बसला. नंतरच्या काळात उष्णता वाढल्यानं उत्पादकता आणखी घटली.

त्यामुळे अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) यंदा निम्म्यानं कमी होऊन २५० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज अर्जेंटीनातील ब्यूनस आयर्स ग्रेन्स एक्सचेंजने व्यक्त केला.

अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील समिकरणच बदलले. जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनात अर्जेंटीना तिसऱ्या स्थानावर आहे. पण सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत आघाडीवर असतो.

पण यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा जबर फटका बसला. हंगामाच्या सुरुवातीला अर्जेंटीनात ५२० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज होता. मात्र दुष्काळाची दाहकता जशी वाढत गेली तसे येथील उत्पादनाचे अंदाज कमी होत गेले.

Soybean Market
Soybean Rate: सोयाबीन दरात किती वाढ झाली?

अर्जेंटीनातील ब्यूनस आयर्स ग्रेन्स एक्सचेंजने नुकतेच देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज बदलला. एक्सचेंजच्या मते अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन २५० लाख टनांवर स्थिरावेल. आधीच्या अंदाजात एक्सचेंजने ४० लाख टनांची कपात केली.

याआधी अर्जेंटीनात २९० लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला गेला होता. आधी दुष्काळ आणि मागील काही दिवसांपासून उष्णता वाढली. त्यामुळे उत्पादनाच्या अंदाजात कपात करण्यात आल्याचे एक्सचेंजने म्हटले आहे.

सोयाबीन उत्पादन घटल्याने अर्जेंटीनाची सोयाबीन आयात वाढणार आहे. अर्जेंटीना २०२३ मध्ये १०० लाख टन सोयाबीन आयात करेल, असा अंदाजही एक्सचेंजने व्यक्त केला. यापैकी बहुतेक सोयाबीन ब्राझीलमधून आयात होईल. तर पेरुग्वे, बोलिविया आणि उरुग्वे या देशांमधूनही आयात होणार आहे.

ब्राझीलला संधी

अर्जेंटीना दरवर्षी ब्राजीलमधून सरासरी ३ लाख टन सोयाबीन आयात करत असते. पण यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यानं अर्जेंटीनाला १०० लाख टनांची आयात करावी लागेल. एवढं सोयाबीन पेरुग्वेमध्ये मिळणार नाही.

त्यामुळे २०२३ मध्ये अर्जेंटीनाला ब्राझीलमधून ५० लाख टनांपर्यंत सोयाबीन आयात करावी लागेल. पेरुग्वेमधील सोयाबीन उत्पादन ९० ते १०० लाख टनांपर्यंतच स्थिरावेल, असा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी सोयाबीन मागे ठेवलं

अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटल्याने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने सोयाबीनचा स्टाॅक मागे ठेवला. शेतकरी चांगला दर मिळाल्याशिवाय स्टाॅक बाहेर काढणार नाहीत.

अर्जेंटीनात महागाई १०० टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे पुढील काळात दरवाढ होईलच, या आशेने शेतकरी दीर्घकाळासाठी सोयाबीन मागे ठेवतील, असा अंदाज ब्यूनस आयर्स एक्सचेंजने व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com