अर्जेंटीनाच्या सुर्यफूल तेलाच्या किमतीत ४७ टक्क्यांनी वाढ

शिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युध्दाचा फटका काळ्या समुद्रातून होणाऱ्या निर्यातीला बसला आहे. निर्यातीमधील अनिश्चिततेमुळे मागच्या दोन आठवड्यात अर्जेंटिनाच्या सुर्यफूल तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
Sunflower
Sunflower

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युध्दाचा फटका काळ्या समुद्रातून होणाऱ्या निर्यातीला बसला आहे. निर्यातीमधील अनिश्चिततेमुळे मागच्या दोन आठवड्यात अर्जेंटिनाच्या सुर्यफूल तेलाच्या (Sunflower Oil Rate) किमती वाढल्या आहेत.  अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) माहितीनुसार, २३ फेब्रुवारी ते ८ मार्च या दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत सुर्यफूल तेलाचे दर ४७ टक्क्यांनी वाढले आहेत.

हेही वाचा - अर्थसंकल्पातील कृषीच्या तरतुदी योग्य दिशेने; शेतकरी नेत अनिल घनवट यांची प्रतिक्रिया   युएसडीएच्या (USDA) मार्च महिन्याच्या 'ऑईलसीड: वर्ल्ड मार्केट अँड ट्रेड' अहवालात २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलबिया आणि उत्पादनांच्या निर्यातीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच याचा जागतिक बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला आहे. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात काळ्या समुद्रातील परिस्थिती बिघडल्याने सूर्यफूल तेलाच्या किमती वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा - रशियाने थांबवली खतांची निर्यात अर्जेंटिनामध्ये सूर्यफूल तेलाच्या किमती (Price Sunflower Oil) वाढल्या असून ८ मार्चपर्यंत २२५० डॉलर प्रति टनापर्यंत पोहोचल्या आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीस सूर्यफूल तेलासाठी बाजारपेठ सकारात्मक राहिली. स्पर्धेतील अन्य तेलांच्या तुलनेत जागतिक व्यापारात त्याचा चांगला वाटा होता, असंही अहवालात म्हटलं आहे. युक्रेनमधील बंदर आणि क्रशिंग सुविधा बंद झाल्यामुळे या महिन्यात सूर्यफूल बियाणे आणि उत्पादनांची निर्यात कमी झाली आहे. परिणामी सूर्यफूल बियाण्यांची निर्यात ५७ टक्क्यांनी घसरली. तर तेल निर्यात १४ टक्क्यांनी कमी झाली आहे, तसेच पेंडेची निर्यात १३ टक्क्यांनी घटली आहे. यामुळे मार्चमध्ये युक्रेनमधील सूर्यफूल बियाण्यांचा साठा जवळपास सात पटीने वाढून १९ टन झाला आहे. निर्यातीमधील अनिश्चिततेमुळे रशियामधील निर्यातदारांनी निर्यात कपात करण्याचा  निर्णय घेला. रशियामधील सूर्यफुल बियांच्या निर्यातीत ३३ टक्के, सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत ४ टक्के आणि सूर्यफूल पेंडीच्या निर्यातीत ३ टक्के घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, २०२१-२२ या विपणन वर्षात सुर्यफूल तेलाच्या एकूण निर्यातीत युक्रेन आणि रशियाचा वाटा अनुक्रमे ४७ टक्के आणि ३० टक्के होता. तसेच या विपणन वर्षात सूर्यफूल तेलाच्या जागतिक आयातीमध्ये भारताचा वाटा २२ टक्के असेल, असाही अंदाज आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे काळ्या समुद्रातून होणाऱ्या निर्यातीवर परिणाम झाल्याने रशिया आणि युक्रेनकडून सुर्यफूल तेलाची निर्यात ठप्प झाली आहे. विशेषतः भारत आणि चीनसारख्या वनस्पती तेलाच्या सर्वात मोठ्या आयातदार देशांत चिंतेचे वातावरण आहे.  वनस्पती तेलाच्या इतर आयातदारांमध्ये युरोपिय संघ, तुर्की, इराण आणि इजिप्त इत्यादी देशांचा समावेश होतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com