Soybean Market : सोयाबीन उत्पादकांसाठी अर्जेंटीनाचं धोरण; भारताचं काय?

अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर पाॅलिसीमुळं आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव आहे. पण अर्जेंटीनातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळं येथील शेतकरी सोयाबीन विक्री वाढवत आहेत.
soybeans
soybeansAgrowon

Soybean Rate Update : अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर पाॅलिसीमुळं आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव आहे. पण अर्जेंटीनातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळं येथील शेतकरी सोयाबीन विक्री वाढवत आहेत. तर भारतात सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर दिसतात.

बाजारातील सोयाबीन आवकही (Soybean Arrival) काहीशी अधिक आहे. एकीकडे अर्जेंटीना आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाॅलिसी राबवत आहे. तर भारत सरकारच्या पाॅलिसीमुळे सोयाबीनवर दबाव आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरावर अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर धोरणाचा परिणाम झाला. अर्जेंटीनाने सोयाडाॅलर धोरण जाहीर केल्यानंतर सोयाबीन आणि सोयापेंडचे दर नरमले. अर्जेंटीना सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत आघाडीवर आहे.

सोयाडाॅलर धोरणामुळे अर्जेंटीनातील शेतकरी स्टाॅक बाहेर काढत आहेत. यंदा अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळं अर्जेंटीनात दर सुधारले आहेत.

शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा आहे. परिणामी शेतकऱ्यांनी सोयाबीन मागे ठेवलं. शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवल्यानं बाजारात टंचाई होती. उद्योगांना माल मिळत नव्हता. त्यामुळं सरकारनं सोयाडाॅलर पाॅलिसी आणली.

soybeans
Soybean Market : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन निम्म्यावर

देशातून सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेल निर्यात वाढावी, यासाठी अर्जेंटीना सरकारने शेतकऱ्यांसाठी ३०० पेसो प्रतिडाॅलर एक्सचेंज रेट जाहीर केला. पेसो हे अर्जेंटीनाचे चलन आहे. अधिकारीकरित्या २०९ पेसो प्रतिडाॅलर असा एक्सचेंज रेट आहे.

पण सरकारने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जवळपास १९१ पेसो जास्त रेट दिला. म्हणजेच शेतकऱ्यांना जास्त दर मिळणार.

वरचा भार अर्जेंटीना सरकार उचलणार आहे. यामुळं शेतकरीही सोयाबीन विकत आहेत. त्याचा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारात दिसत आहे. त्यामुळं गुरुवारी बाजार कमी होऊन बंद झाला होता.

अर्जेंटीनातील शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवल्यानं तेथील सरकारनं शेतकऱ्यांना जास्त दर मिळावा यासाठी सोयाडाॅलर पाॅलिसी आणली. इकडं भारतातही शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेने माल मागं ठेवत आहेत. पण सरकारनं सोयाबीन उत्पादकांकडे सपशेल दुर्लक्ष केलं.

म्हणजेच शेतकऱ्यांना उद्योगांच्या भरवशावर ठेवलं. भारत सरकारही अर्जेंटीनाप्रमाणं एखादं धोरण जाहीर करु शकतं. पण त्यासाठी इच्छा असावी लागते. तसचं सरकारवर शेतकऱ्यांचा दबावही असायला हवा. पण नेहमीप्रमाणं शेतकऱ्यांचा दबावगट कमी पडतो.

देशातील बाजारात सोयाबीन दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसत आहे. पण अपेक्षित दरवाढ झाली नाही. बाजारत सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

soybeans
Soybean Market : परभणीत सोयाबीनचे दर वाढून पोचले पाच हजारांवर

हंगामाच्या सुरुवातीपासून ही दरपातळी कायम आहे. शेतकऱ्यांनी सुरुवातीचे तीन महिने वाट पाहिली. नंतर मात्र पॅनिक सेलिंग झाले. मार्च महिन्यात सर्वाधिक सोयाबीन बाजारात आले. त्यामुळं दरपातळी हंगामातील निचांकी पातळीवर होती.

सोयाबीनचे दर मुख्यतः सोयापेंडवर अवलंबून असतात. यंदा भारताच्या सोयापेंडला चांगली मागणी आहे. बांगलादेश, व्हिएतनाम, जपान आदी देशांनी सोयापेंड आयात वाढवली.

सोयापेंडला दरही चांगला होता. पण सोयाबीन उत्पादकांपर्यंत हा लाभ पोचला नाही. त्यातच सरकारनं खाद्यतेल आयात शुल्क कमी करून सोयातेल दबावात ठेवलं.

त्याचाही दबाव दरावर आला. एकीकडे अर्जेंटीना आपल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला यासाठी पाॅलिसी आणते तर भारत सरकारनं दर कमी व्हावे यासाठी पाॅलिसी आणली. पण सोयाबीन दरावर पुढील काळात दबाव आणतील असे कोणतेही फंडामेंटल्स दिसत नाहीत.

सोयापेंडशाठी सोयाबीनला मागणी आहे. अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलरमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर नरमले आहेत. पण ही स्थिती जास्त दिवस राहणार नाही. तसचं देशात उद्योगांना सोयापेंड निर्यातीचे सौदे पूर्ण करण्यासाठी सोयाबीनची गरज आहे.

त्यामुळं सोयाबीन दर सुधारत आहेत. सोयाबीनमधील ही दरवाढ कायम राहील. तरीही शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com