नगरला टोमॅटो, बटाट्याची आवक टिकून

भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार सुरू : फळांची आवकही चांगली
Tomato Potato Market
Tomato Potato MarketAgrowon

नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dada Patil Shelke APMC) आठवडाभरात टोमॅटो (Tomato Arrival), बटाट्याची आवक (Potato Arrival) टिकून आहे. दरात चढ-उतार सुरू आहे. फळांची आवकही (Fruit Arrival) बऱ्यापैकी सुरू असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात टोमॅटोची १३३ ते १४० क्विंटलची दररोज आवक झाली आणि प्रती क्विंटल १५०० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. वांगीची ४० ते ५० क्विंटलची आवक होऊन १००० ते २५००, फ्लॉवरची ३० ते ४० क्विंटलची आवक होऊन २००० ते ३०००, कोबीची ५६ ते ६० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १०००, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन १००० ते १२००, गवारची ३० ते ३२क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ४ हजार, घोसाळ्याची ९ ते १० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, दोडक्याची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन हजार ते ३ हजार, कारल्याची २० ते २२ क्विंटलची आवक होऊन २००० ते ३ हजार, भेंडीची ६० ते ६५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३०००, घेवड्याची ५ ते ७ क्विंटलची आवक होऊन ८ हजार ते १२ हजार ५००, वाल शेंगाची ५ ते ७ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार, बटाट्याची २९७ ते ३०० क्विंटलची आवक होऊन १४०० ते १६००, हिरव्या मिरचीची ४३ ते ५० क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार५००, शेवग्याची १९ ते २२ क्विंटलची आवक होऊन १हजार ते २ हजार, शिमला मिरचीची २३ ते २५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजाराचा दर मिळाला. भाजीपाल्यात कोथिंबीर, मेथी, पालक, चुका, पालक भाजीला चांगली मागणी राहिली. वाटाण्याची आवक कमी झाली. वाटाण्याची मागील आठवड्यात दर दिवसाला १० ते १२ क्विंलटली आवक होऊन ६ हजार ते सात हजार रुपयाचा दर मिळाला. कांदा पातीचीही आवक होत आहे.

फळांची आवक सुरूच

नगरला बाजार समितीत मागील आठवडाभरात दर दिवसाला साधारणपणे सहाशे ते साडे सहाशे क्विंटल फळांची आवक होत आहे. त्यात कलिंगड खरबूज आणि द्राक्षाचा अधिक समावेश आहे. कलिंगडाची ३५० क्विंटलपर्यंत आवक होऊन ३०० ते १००० तर खरबुजाची १४५ ते १५० क्विंटलची आवक होऊन ५०० ते २००० रुपयाचा दर मिळाला. संत्र्यांची १३ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ६हजार, डाळिंबाची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १२ हजार, पपईची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २५०० द्राक्षाची ४० क्विंटलपर्यतची आवक होऊन २ हजार ते ४ हजाराचा दर मिळाला. आंब्याची आवकही सुरु झाली आहे. बदाम, लालबाग, हापूस आवक होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com