बांगलादेशने वाढविले संत्र्यांवर आयात शुल्क

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्र्यांची लागवड (orange Cultivation) आहे. त्यापैकी १ लाख २५ हजार क्षेत्र एकट्या विदर्भात आहे.
oranges
orangesAgrowon

अमरावतीः विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्यांचा (orange) मुख्य आयातदार बांगलादेश आहे. एकूण उत्पादनाच्या २० टक्‍के निर्यात (orange Export) बांगलादेशात होते. परंतु बांगलादेश सरकारने आयात शुल्कात ३४ रुपये किलोवरून यंदा ४३ रुपये अशी वाढ केली आहे. ती कमी करावी, अशी मागणी इंडो-बांगला ऑरेंज असोसिएशनने केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना निवेदन देत या प्रकरणी हस्तक्षेत्राची मागणी करण्यात आली आहे. राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्र्यांची लागवड (orange Cultivation) आहे. त्यापैकी १ लाख २५ हजार क्षेत्र एकट्या विदर्भात आहे. टेबलफ्रुट म्हणून संत्र्यांचा जागतीकस्तरावर उपयोग होतो.

या फळाची टिकवण क्षमता कमी असल्याने त्याच्या निर्यातीला देखील मर्यादा आहेत. तरीसुद्धा बांग्लादेशमधून नागपुरी संत्र्याला मोठी मागणी राहते. एकूण उत्पादनाच्या २० टक्‍के निर्यात ही बांगलादेशात होते. त्यासाठी ५० ते ५५ निर्यातदारांकडून दर निश्‍चित केले जातात. त्यानंतर ‘ताज फ्रूट कंपनी’ तसेच ‘एम.के.सी. ॲग्रो फ्रेश लिमिटेड’ यांच्या माध्यमातून निर्यात होते.

गेल्यावर्षी प्रतिकिलो आयात शुल्क ३४ रुपये प्रमाणे होते. यंदा मात्र बांगलादेश सरकारने आयात शुल्कात पुन्हा मोठी वाढ केली आहे. ३४ रुपयांवरून थेट ४३ रुपये आयात शुल्क करण्यात आले. त्याचा परिणाम थेट संत्रा निर्यातीवर (orange Export) होणार आहे. त्यामुळे गडकरी यांनी यामध्ये हस्तक्षेप करून बांगलादेश सरकारशी चर्चेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीचे (SFPO) मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com