
Soybean Rate : ब्राझीमध्ये यंदा सोयाबीन आणि मका उत्पादन (Maize production) वाढले. त्यामुळे यंदा ब्राझीलमधून सोयाबीन आणि मका निर्यात विक्रमी पातळीवर पोचण्याची शक्यता आहे.
ब्राझीलमधून यंदा ९३० लाख टन सोयाबीन निर्यात होईल. तर मक्याची निर्यात ५०० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज ब्राझील ग्रेन्स एक्सपोर्टर्स असोसिएशन अर्था अॅनेकने व्यक्त केला.
जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर आहे. तर मका उत्पादनातही ब्राझीलचे स्थान महत्वाचे आहे. मागील हंगामात ब्राझीलने ७७८ लाख टन मका निर्यात केली होती. ती यंदा ९३० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे.
म्हणजेच यंदा ब्राझीलची सोयाबीन निर्यात १९.५ टक्क्यांनी वाढणार आहे. तर मका निर्यात १६ टक्क्यांनी वाढणार आहे. मागील हंगामात ब्राझीलने ४३१ लाख टन मका निर्यात झाली होती. ती यंदा ५०० लाख टनांवर पोचणार आहे, असेही अॅनेक या संस्थेने स्पष्ट केले.
सोयाबीन निर्यात
ब्राझीलची मार्च महिन्यातील सोयाबीन निर्यात यंदा वाढली. यंदाच्या मार्च महिन्यात ब्राझील १४२ लाख टन निर्यात करण्याची शक्यता आहे. मागील हंगामातील मार्च महिन्यातील निर्यात १२१ लाख टन होती.
तर फेब्रुवारी महिन्यातील निर्यात २ लाख टनांनी कमी राहून ७५ लाख टनांवर आली होती. ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य खरेदीदार चीन ठरला. चीनने ७२ टक्के सोयाबीन खरेदी केले. तर स्पेनने ७ टक्के, रशियाने ३ टक्के आणि अर्जेंटीनाने २ टक्के आयात केली.
मका निर्यात वाढली
ब्राझीलने मार्च महिन्यात ८०३ टन मका निर्यातीची शेक्यता आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्यात ब्राझीलने १०७ टन निर्यात केली होती. तर फेब्रुवारीतील निर्यात १९ लाख टन होती. जी मागीलवर्षी याच महिन्यात १४ लाख टन होती.
ब्राझीलच्या एकूण निर्यातीपैकी २३ टक्के मका जपानने खरेदी केला. तर व्हिएतनामने १० टक्के, दक्षिण कोरिया आणि कोलंबियाने ९ टक्के आयात केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.