Soybean Market : ब्राझीलच्या जैवइंधन धोरणामुळे सोयाबीन बाजार सुधारणार ?

अर्जेंटीना सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असूनही सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीत आघाडीवर असतो. यंदा अर्जेंटीनात दुष्काळामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Soybean Rate : बॅंकींग क्षेत्रातील संकटाचा परिणाम आंतरराष्ट्रीय शेतीमाल बाजारावरही होत आहे. देशातील निर्यातीवरही परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दरावर दबाव आला. दुसरीकडे अर्जेंटीनात दुष्काळामुळे सोयाबीन उत्पादन (Soybean Producer) घटले तरी ब्राझीलमध्ये उत्पादनात मोठी वाढ झाली.

त्यामुळे बाजाराला जास्त आधार मिळाला नाही. पण ब्राझीलने जैवइंधनाचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला. ब्राझीलमध्ये जैवइंधनासाठी ७० टक्के सोयातेल वापरले जाते. यामुळं सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आपल्याला माहितच आहे की जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर आहे. पण ब्राझीलमध्ये एकूण उत्पादनाच्या निम्मही गाळप होत नाही. ब्राझील थेट सोयाबीनची निर्यात जास्त करतो. त्यामुळे ब्राझीलची सोयातेल आणि सोयापेंड निर्यात तुलनेत कमी आहे.

परिणामी अर्जेंटीना सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असूनही सोयातेल आणि सोयापेंड निर्यातीत आघाडीवर असतो. यंदा अर्जेंटीनात दुष्काळामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली.

पण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले होते. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात अर्जेंटीनातील उत्पादन घटीचा जास्त परिणाम जाणवला नाही.

Soybean Market
Soybean Market : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन निचांकी पातळीवर

ब्राझीलमध्ये जैवइंधनात सोयातेलाचा मोठा वापर होतो. सध्या ब्राझीलमध्ये जैवइंधान मित्रणाचे प्रमाण १० टक्के आहे. ते एप्रिलपासून १२ टक्के करण्याचे धोरण ब्राझील राबविणार आहे.

तर २०२६ पर्यंत इंधनात जैवइंधानाचे प्रमाण १५ टक्के करण्याचे उद्दीष्ट ब्राझील नॅशनल एनर्जी पाॅलिसी कमिटीने जाहीर केले.

यापुर्वी ब्राझीलने मार्च २०२३ पर्यंत १५ टक्के जैवइंधन वापराचे उद्दीष्ट ठवले होते. पण २०२१ मध्ये महागाई वाढल्यानं सरकारने उद्दीष्ट १० टक्क्यापर्यंत आणलं होतं.

ब्राझीलमध्ये मागील काही वर्षांपासून जैवइंधनाला मागणी वाढली. त्यामुळे ब्राझीलमधील जैवइंधन क्षेत्राने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.

जैवइंधन निर्मिती उद्योग, खाद्यतेल उद्योग, आणि वाहन निर्मिती उद्योगांनी जैवइंधन वापराचे प्रमाण २०२४ पर्यंत १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असाही अंदाज व्यक्त केला.

ब्राझीलचा सोयातेलाचा वापर वाढणार

ब्राझीलमध्ये जैवइंधन उत्पादनासाठी ७० टक्के सोयातेलाचा वापर केला जातो. सरकारने जैवइंधन वापराचे उद्दीष्ट २ टक्क्यांनी वाढवले. यामुळे जैवइंधन निर्मितीसाठी ८ लाख टन सोयातेलाचा अधिक वापर होईल. म्हणजेच ब्राझीलचा सोयातेल वापर वाढणार आहे.

यंदा ब्राझीलमध्ये ५२७ लाख टन सोयाबीन गाळपाचा अंदाज आहे. यातून सोयातेलाचे उत्पादन ४०४ लाक टन आणि सोयापेंडचे उत्पादन १०८ लाख टन होईल, असा अंदाज कोनाब या संस्थेने व्यक्त केला.

सोयाबीनला आधार मिळेल

ब्राझीलच्या या निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला आधार मिळू शकतो. कारण यंदा अर्जेंटीनात दुष्काळामुळे उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे अर्जेंटीनाची सोयातेल निर्यात कमी राहणार आहे.

परिणामी ब्राझीलमधून सोयातेल निर्यात वाढेल, असा अंदाज होता. पण जैवइंधन धोरणामुळे ब्राझीलमध्ये वापर जास्त होईल, निर्यात कमी राहू शकते. यामुळे सोयातेल आणि सोयाबीनला आधार मिळू शकतो.

Soybean Market
Soybean Market : शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखलं, मग बाजारात कुठून आलं?

आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव का?

अमेरिकेत सध्या बॅंकींग क्षेत्रात संकटाचे ढग आहे. चलनक्षेत्रात संकटाची चाहूल लागताच गुंतवणूकदार कमोडीटी बाजारातील गुंतवणूक कमी करतात. याचा परिणाम दरावर होत असतो. त्यामुळे सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड दरावर दबाव आहे.

देशातून होणाऱ्या निर्यातीवरही परिणाम होत असतो. पण ही स्थिती जास्त दिवस टिकत नाही. देशातील मागणी पुरवठ्यानुसार दर बदलत असतात. त्यामुळे देशातील सोयाबीन दरावर जास्त काळ दबाव राहणार नाही, अशी माहिती बाजारातील अभ्यासक आणि निर्यातदारांनी दिली.

देशातील दर कधी सुधारतील?

सध्या देशातील बाजारात सोयाबीनची आवक जास्त आहे. त्याचाही दरावर दबाव आहे. सध्या सोयाबीनला ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय. एप्रिलच्या मध्यानंतर आवक कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर सुधारु शकतात, असाही अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

अर्जेंटीनात यंदा दुष्काळ पडला. ब्राझीलकडून सोयातेलाचा पुरवठा वाढण्याची शक्यता होती. पण जैवइंधन धोरणामुळे पुरवठा कमी राहिल. सध्या बॅंकींग क्षेत्रातील संकटामुले सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडवर दबाव आहे. पण हा दबाव जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही. ब्राझीलच्या जैवइंधन धोरणाचाही आधार मिळू शकतो.
राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com