Onion:कांदा विक्री बंद आंदोलनाची हाक

गेल्या सात आठ महिन्यांपासून कांद्याला (Onion) उत्पादन खर्चापेक्षा (Production cost) कमी दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालं.
Onion
OnionAgrowon

पुणेः शेतकऱ्यांच्या कांद्याचं (Onion) नैसर्गिक संकटांमुळं यंदा मोठं नुकसान झालं. मात्र बाजारातही कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. यातून शेतकऱ्यांचं मोठ नुकसान होत आहे. त्यामुळं कांद्याला किमान २५ रुपये प्रतिकिलोचा दर द्यावा या मागणीसाठी १६ ऑगस्टपासून कांदा बंद आंदोलन होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी दिली.

गेल्या सात आठ महिन्यांपासून कांद्याला (Onion) उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालं. असं असताना राज्य आणि केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं.

काही दिवस भाव वाढल्यावर कांदा कांदा निर्यातबंदी, आयात, कांदा व्यापाऱ्यावर धाडी टाकणे, कांदा साठ्यावर मर्यादा आदी निर्णय घेऊन सरकार कांद्याचे दर पाडते. मात्र आता शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात असताना सरकारचे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे, अशा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही कांदादराप्रश्नी पाठपुरावा केला आहे. परंतु तरीही कांद्याच्या दरात वाढ होण्यासाठी सरकारने कोणतेही पावले उचलली नाहीत. तसचं आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांनीही कांदा प्रश्नावर ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळं कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत (APMC) मातीमोल भाव मिळतोय. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला २० ते २२ रुपये आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून कांद्याला सरासरी ८ ते १० रुपये इतका कमी दर मिळत आहे. नाफेडने अडीच लाख टन कांदा खरेदी केला. पण शेतकऱ्यांना १० ते १२ रुपये किलोचा दर दिला. म्हणजेच नाफेडनेही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले, असे भारत दिघोळे म्हणाले.

शेतकऱ्यांनी एप्रिल आणि मे महिन्यात चाळींमध्ये कांद्याची साठवणूक केलेली आहे. मात्र खराब हवामानामुळे चाळींमधील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर बाजार समितीत कांदा विक्री केल्यास कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान सुरू आहे. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी २५ रुपये प्रति किलोचा दर मिळावा, अन्यथा १६ ऑगस्ट २०२२ पासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील, असा इशाराही या संघटनेने दिला आहे.

Onion
भटक्या कुत्र्यांची समस्या कधी सुटणार?

महाराष्ट्रातून कांद्याची शंभर टक्के विक्री बंद झाल्यास देशात कांदा टंचाई निर्माण होईल. यामुळं सरकारवर दबाव येईल. शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी २५ रुपये दर मिळावा म्हणून हे कांदा विक्री बंद आंदोलन केले जाणार आहे.

- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com