कोचीन आणि इतर बंदरावरूनही पामतेल आयात सुरु करण्याची मागणी

केरळमधील बंदरांच्या माध्यमातून पामतेलाची आयात बंद करण्यापेक्षा सरकारने कोकोनट ऑइल निर्मिती क्षेत्राला रास्त दर जाहीर द्यावा, इतर अनेक उपाययोजनांच्या माध्यमातून कोकोनट ऑइल क्षेत्राला आधार द्यावा.
Palm Oil Import
Palm Oil ImportAgrowon

इंडोनेशियाकडून पामतेल निर्यात बंदी उठवल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून आयात केलेले पामतेल कोचीन आणि केरळमधील बंदरांवर उतरवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कोचीन पोर्ट युझर्स फोरमतर्फे विदेशी व्यापार संचालनालयाकडे (DGFT) करण्यात आली आहे.

भारताने आयात केलेले पामतेल इतर प्रमुख बंदरांप्रमाणेच कोचीन आणि केरळमधील बंदरांवर उतरवण्यात येत होते. मात्र काही वर्षांपूर्वी कोकोनट ऑईलच्या दरवाढीच्या दृष्टीकोनातून केरळ सरकारने आयात केलेले पामतेल कोचीनसह केरळमधील बंदरांवर उतरवणे थांबवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी, अशी मागणी कोचीन पोर्ट युझर्स फोरमचे अध्यक्ष प्रकाश अय्यर यांनी केली आहे.

पामतेलाची जहाजे कोचीनऐवजी शेजारच्या तुतिकोरिन, न्यू मंगलोर या बंदरांवर उतरण्यात यायला लागली. त्यानंतर हे पामतेल रस्ते मार्गाने केरळमध्ये दाखल व्हायला लागले. डीजीएफटीच्या (DGFT) निर्णयामुळे केरळमधील प्रमुख बंदरांवरील एकूण व्यवसायात आणि रोजगारात घट झाल्याचे अय्यर म्हणाले आहेत.

केरळ सरकारने ज्या कोकोनट ऑइल उत्पादकांच्या हितांसाठी हा निर्णय घेतला होता, त्या कोकोनट ऑईलच्या आणि मूल्यवृद्धी केलेल्या उत्पादनांच्या किमतीही सातत्याने घटत आहेत. केरळमधील बंदरांच्या माध्यमातून पामतेलाची आयात बंद करण्यापेक्षा केरळ सरकारने कोकोनट ऑइल निर्मिती क्षेत्राला रास्त दर जाहीर द्यावा, इतर अनेक उपाययोजनांच्या माध्यमातून कोकोनट ऑइल क्षेत्राला आधार द्यावा.

त्यासाठी केरळमधील बंदरांमार्फत होणारी पामतेलाची आयात थांबवण्याचा निर्णय मागे घ्यावा. या निर्णयामुळे आयातीसाठीच्या खर्चात बचत होणार आहे. तसेच कंटेनर्सच्या टंचाईचाही प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. पामतेलासाठी आलेल्या रिकाम्या कंटेनर्सचा पुनर्वापर करता येणार असल्याचेही अय्यर म्हणाले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com