हरभऱ्याची भिस्त नाफेडच्या खरेदीवर

हरभऱ्याच्या आयातीमुळे तसेच सणासुदीच्या काळात हरभऱ्याला कमी मागणी असल्याने दर दबावात आहेत
हरभऱ्याची भिस्त नाफेडच्या खरेदीवर
Chana Crop

कमी मागणी, आयातीमुळे हरभरा दर दबावात पुणे - यंदाचा हंगाम हरभऱ्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांतील हरभऱ्याचे दर बघितल्यास लागवडीनंतर हरभऱ्याचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (Minium Support Price) अधिक होते. यंदा मात्र लागवड (Sowing) सुरू झाली तरी दर दबावात आहेत. राज्यातील प्रमुख बाजारात दर 4200 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. ( chana market depends on MSP procurement)   

हरभऱ्याच्या आयातीमुळे तसेच सणासुदीच्या काळात हरभऱ्याला कमी मागणी असल्याने दर दबावात आहेत. यामुळे यंदा हरभरा लागवड क्षेत्रात विशेष वाढ झालेली नसली तरीही दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. गेल्या काही दिवसात राज्यभरात (Maharashtra) हरभरा दरात घट झाली आहे. राज्यभरातील प्रमुख बाजारात सध्या दर 4200 ते 5000 रुपयांवर आहेत. त्या तुलनेत काही दिवसांपुर्वी हरभऱ्याचे दर सुमारे 5900 ते 5100 रुपये प्रति क्विंटल होते.

गेल्या सहा महिन्यात हरभऱ्याचे दर ८ ते १० टक्क्यांनी तुटले आहेत. यंदा केंद्र सरकारने हरभऱ्याला ५,२३० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहिर केला आहे. त्यामुळे मार्चपासून आवक सुरू झाल्यावर हरभऱ्याची काय स्थिती राहिल हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. दिल्ली बाजारात हरभऱ्याचे भाव ५२०० ते ५२५० वर स्थिर आहेत तर मुंबई बाजारात दर ४,५०० ते ५,००० रुपयांवर आहेत.

आफ्रिकन देशांमधून हरभऱ्याची आयात सुरू आहे. त्याचबरोबर नाफेडकडेसुद्धा पुरेसा हरभरा साठा उपलब्ध आहे. तसेच उपलब्ध साठ्यातून नाफेड विक्री करत आहे. या दुहेरी कारणामुळे हरभऱ्याच्या भावात जास्त सुधारणा झाली नाही. रशिया आणि टांझानियामधून हरभरा ४,५०० ते ४,८०० रुपये प्रति क्विंटल या दराने आयात झाला असल्याचे जाणकारांनी सांगितले. काय आहे लागवडीची स्थिती

कें द्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशपातळीवर मागील आठवड्यापर्यंत ९७ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही आघाडीवरची राज्ये आहेत. महाराष्ट्र वगळता यंदा हरभऱ्याऐवजी शेतकरी मोहरीला पसंती देताना दिसत आहेत.    

प्रतिक्रिया मार्चपर्यंत हरभऱ्याच्या भावात मोठी सुधारणा होईल असे सध्या तरी दिसत नाही. नाफेडने वेळेवर हरभरा खरेदी चालू केल्यास दराला आधार मिळू शकतो.  - सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार विश्लेषक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.