Chilli: आंध्र प्रदेशात मिरचीचा ठसका का वाढतोय?

गेल्या हंगामात मिरचीवर काळ्या फुलकिड्यांचा (black thrips) प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु तरीही शेतकरी माघार घ्यायला तयार नाहीत.
Chilli Production
Chilli ProductionAgrowon

देशात आणि आंध्र प्रदेशात यंदा मिरचीच्या (Chilli) वाढीव दराचा ठसका उडाला. त्यामुळे आंध्र प्रदेशात शेतकरी येत्या रब्बी हंगामात पुन्हा एकदा मिरचीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची शक्यता आहे. वास्तविक गेल्या हंगामात मिरचीवर काळ्या फुलकिड्यांचा (black thrips) प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु तरीही शेतकरी माघार घ्यायला तयार नाहीत. वाढत्या दराची एक प्रकारे खात्री असल्याने शेतकरी हा धोका पत्करायला तयार आहेत.

फुलकिड्यांमुळे (black thrips) आंध्र प्रदेशात मिरचीचे ७५ टक्के पीक खराब झाले. तरीसुद्धा शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल कमी झालेला नाही. त्यामुळे अनेक देशी, विदेशी कृषी रसायन कंपन्या व्यावसायिक संधी हेरून पुढे सरसावल्या आहेत. या कंपन्यांची फुलकिडीच्या समस्येवर उपाय म्हणून विविध उत्पादने बाजारात आणली आहेत.

Chilli Production
Samyukt Kisan Morcha: कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र : योगेंद्र यादव

आंध्र प्रदेशात मिरचीला आधीच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट दर मिळाला. खम्मम येथील कृषी उत्पादन बाजार समितीत (APMC) तेजा मिरचीला सरासरी १७ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. याच बाजारात मिरचीला २१,२०० रुपये असा कमाल दर मिळाला. गेल्या वर्षी खम्मम बाजारात तेजा मिरचीला १०,८०० रुपये दर मिळाला होता.

Chilli Production
Paddy Stubble: पंजाबमध्ये 'या' शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

खम्ममप्रमाणेच वारंगलच्या (Warangal) कृषी उत्पादन बाजार समितीत मिरचीच्या वंडर हॉट वाणाला जवळपास ३२ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. इथला कमाल दर ३५ हजार रुपये क्विंटल राहिला.

मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे कृषी रसायन कंपन्यांचे लक्ष आहे. किडीचा प्रादुर्भाव होऊनही शेतकरी मिरचीचे पीक सोडायला तयार नाहीत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये नव-नवीन उत्पादने बाजारात आणण्याची स्पर्धा लागली आहे. इन्सेक्टिसाईड्स (इंडिया) कंपनीने निस्सान केमिकल कार्पोरेशनच्या सहकार्याने उत्पादन विकसित केले आहे. तर सिंजेंटा या बहुराष्ट्रीय कंपनीनेही आपले उत्पादन विकसित केले आहे. अनेक कंपन्यांनी होमिओपॅथिक उत्पादने बाजारात आणली आहेत.

Chilli Production
Rice Procurement : तेलंगणातील तांदूळ खरेदीस एफसीआयचा होकार

दरम्यान, मिरचीवर काळ्या फुलकिड्यांचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी खतांचा आणि कीडनाशकांचा अनावश्यक मारा करू नये, असा सल्ला प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाने दिला आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पीकसंरक्षण सल्ला दिला आहे. काही रसायनांबरोबर नीम तेल मिसळून फवारण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच निळ्या चिकट सापळ्यांचा वापर आणि मिरची पिकाभोवती दोन ते तीन ओळींत ज्वारी किंवा मक्याची सापळा पीक म्हणून लागवड करण्याचा सल्लाही शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com