आंबा पिकांची नुकसानभरपाई द्या

बागायतदारांची शासनाकडे मागणी
आंबा पिकांची नुकसानभरपाई द्या
MangoAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः अवकाळी पाऊस (Untimely Rain) आणि वादळामुळे आंबा पिकाचे (Damage Mango Crop) मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची भरपाई (Mango compensation) देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी (Mango Farmer) केली.

यावर्षी डिसेंबरपासून सातत्याने अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण राहिले. बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आंबा आहे. त्यावरच बागायतदारांची वर्षाची गुजराण होते. या प्रमुख पिकाचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देऊन दिलासा देण्याची गरज आहे.

वातावरणामुळे कीडरोगांच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. फळमाशी तर बागायतदारांची डोकेदुखीच ठरली आहे. अखेरच्या टप्प्यातील आंबा नाइलाजास्तव कमी दराने कॅनिंगला घालावा लागत आहे. हजारो रुपयांची कीटकनाशके फवारून देखील उत्पादन मिळत नाही. त्यामुळे बागायतदार कर्जबाजारी होत आहेत. त्यांना नुकसानभरपाई द्यावी. या शिवाय विमा परतावा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आंबा बागायतदार विलास रूमडे, शिवाजी साटम, प्रथमेश कणेरकर, संकेत लब्धे, उमेश मोहिते, मंगेश तेली, शुभम चौगुले, प्रियांका रासम, प्रणव रासम, सुधाकर वाळके यांनी हे निवेदन देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांना दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com