Cotton Market : कापूस बाजारभाव टिकून; वायद्यांमध्ये मात्र नरमाई

आता गाठींऐवजी खंडीमध्ये व्यवहार होत आहेत. एक कापूस गाठ १७० किलोची असते तर खंडी ३५६ किलोची असते. तसेच लाॅटमध्येही बदल केले.
Cotton Market Rate
Cotton Market RateAgrowon

Pune News : मागील काही दिवसांपासून कापसाची दरपातळी (Cotton Rate) सुधारली. या दरातही उद्योगांना अपेक्षेप्रमाणे कापूस मिळला नाही. सध्याची कापूस आवक (Cotton Arrival) सरासरीपेक्षा कमीच असली तरी काहीशी वाढली.

चालू आठवड्यात शेवटच्या दोन दिवस शेतकऱ्यांनी कापूस विक्री वाढवल्याचं दिसलं. चालू आठवड्यात बाजार समित्यांमधील कापूस दर टिकून होते. तर वायद्यांमध्ये नरमाई दिसून आली.

या आठवड्यात कापूस बाजारात चढ उतार राहीले. वायद्यांसाठी हा आठवडा नरमाईचा होता. भारतात वायदे सुरु झाल्यानंतरचा हा पहिलाच आठवडा होता. सोमवारी म्हणजेच १३ तारेखला वायदे सुरु झाले. पण सेबीने वायद्यांमध्ये काही बदल केले.

आता गाठींऐवजी खंडीमध्ये व्यवहार होत आहेत. एक कापूस गाठ १७० किलोची असते तर खंडी ३५६ किलोची असते. तसेच लाॅटमध्येही बदल केले. परिणामी चालू आठवड्यात वाद्यांमध्ये व्हाॅल्यूम आणि ओपन इंटरेस्ट कमी होते.

Cotton Market Rate
Cotton Cultivation : महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार उन्हाळी कापूस लागवड

सोमवारी कापूस वायदे ६३ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर सुरु झाले. बुधवारी उच्चांकी ६४ हजार ३७५ रुपयांपर्यंत वाढ झाली. मात्र त्यानंतर दर कमी होत गेले. शुक्रवारी वायदे ६३ हजार ३०० रुपयांवर बंद झाले. आठवड्याचा विचार करता कापूस वायदे ६०० रुपयांनी नरमले होते.

बाजार समित्यांमधील दराचा विचार करता, दरपातळी कायम होती. कापूस खरेदीचे दर ८ हजार ते ८५०० रुपयांच्या दरम्यान कायम होते. मात्र कापूस आवक काहीशी वाढली होती.

सोमवारी देशातील कापूस आवक १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान होती. बुधवारी १  लाख ३५ हजार गाठी आणि शुक्रवारी १ लाख ५० हजार गाठींवर आली.

आंतरराष्ट्रीय वायदेही नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात नरमाई दिसली. सोमवारी कापसाचे वायदे ८४.६७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. रुपयात हा भाव १५ हजार ४७१ रुपये प्रतिक्विंटल होतो. तर शुक्रवारी वायदे ८०.३८ सेंटवर बंद झाले. रुपयात हा भाव १४ हजार ६८७ रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच कापूस वायदे ७८४ रुपयांनी कमी झाले.

बाजाराची दिशा काय राहू शकते?

देशात चालू आठवड्यात कापसाचे भाव टिकून राहीले. पण आठवड्याच्या शेवटी आवक वाढली होती. सध्याच्या दरपातळी अनेक शेतकरी कापूस विकत आहेत. आर्थिक गरज असलेले शेतकरी मार्चपर्यंत विकतील, असा अंदाज बांधला जातोय.

पण प्रत्यक्ष बाजारात कापूस येत नाही तोपर्यंत नक्की काय ते सांगता येत नाही. बाजारात खरंच कापूस आवक वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो. पण दीर्घकाळात कापूस दर तेजीत राहण्यास घटक अनुकूल आहेत, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com