आर्थिक अडचणींमुळे खरिपावर संकटांचे ढग

हरभरी विक्रीची रक्कम तत्काळ देण्याची शेतकऱ्यांची मागणी
आर्थिक अडचणींमुळे खरिपावर संकटांचे ढग
Chana Agrowon

परतवाडा, जि. अमरावती : खरीप हंगाम (Kharif Season) तोंडावर आला असताना शासनाने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे (Chana) पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्याने बी-बियाणे, खते आदी साहित्याची खरेदी कशी करायची, असा सवाल शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. शासनाने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे.

या वर्षी हरभऱ्याचे बऱ्यापैकी उत्पादन शेतकऱ्यांना झाले. बाजारात जवळपास ४००० ते ४५०० रुपये हरभऱ्याचे दर होते. तर शासनाचे ५२३० रुपये इतके दर होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय खरेदी केंद्रावर गर्दी केली व आपले धान्य दिले. परंतु आता पाऊस तोंडावर आला आहे. मात्र तब्बल एक ते दीड महिना होऊनही शासनाकडून खरेदी करण्यात आलेल्या हरभऱ्याचे पैसे शेतकऱ्याला न मिळाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे करायचे कसे, हा प्रश्‍न आहे. तर पेरणीसाठी लागणाऱ्या बी- बियाणे, खते आदीकरिता पैसे आणायचे कुठून? असे अनेक प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहेत. याकरिता शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे तातडीने द्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून पुढे येत आहे.

एकीकडे पावसाळा तोंडावर आला असताना दुसरीकडे शासनाने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे एक ते दीड महिना होऊन न मिळाल्याने बियाणे आदी पेरणी साहित्याची खरेदी करायची कशी, असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे.
सागर राऊत, शेतकरी, अचलपूर
शेतकऱ्यांना आता पैशाची खरी गरज असताना शासनाने खरेदी केलेल्या चण्याचे पैसे अद्यापही न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
अमोल ठाकरे, शेतकरी, इसापूर
शासनाने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे तब्बल दीड महिन्यानंतर ही न मिळाल्याने शेतकरी हताश झालेला आहे. शेतकऱ्यांना पैसे तातडीने देणे गरजेचे आहे.
रवींद्र पाटील, शेतकरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com