Chana Market : हरभरा उत्पादनात घट; बाजार सुधारेल का?

सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळं शेतकरी नाफेडला जास्तीत जास्त माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत.
Chana Market
Chana Market Agrowon

Chana Market Update : देशातील बाजारात हरभरा आवक (Chana Arrival) वाढत आहे. नाफेडही खेरदीत उतरले आहे. त्यामुळं हरभरा दरात किंचित सुधारणा झाली. बदलत्या वातावरणाचा हरभऱ्याला फटका बसला. नुकत्याच झालेल्या पावसानंही हरभऱ्याचे नुकसान केले.

त्यामुळं उत्पादनात २० ते २५ टक्के घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळं हरभरा बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

शेतीमाल बाजारत सध्या हरभरा उत्पादन आणि दराबाबत वेगवगळे अंदाज आहेत. देशात यंदा ११२ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. त्यामुळं उत्पादन १३६ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज केंद्रानं व्यक्त केला.

पण व्यापारी आणि उद्योग १०० ते ११० लाख टनांच्या पुढे आपला अंदाज नेताना दिसत नाहीत. त्यातच पावसाचा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश तसेच राजस्थानमध्ये हरभरा पिकाला फटका बसला.

महाराष्ट्रात ३० टक्के, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ४० टक्के हरभरा शेतात असल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळं उत्पादनाला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Chana Market
Chana Procurement : त्रेचाळीस हजारांवर हरभरा उत्पादकांचे ऑफलाइन प्रस्ताव

मागील तीन हंगामांमध्ये हरभरा दरानं शेतकऱ्यांना आधार दिला नाही. यंदा उत्पादन नेमकं किती होईल, हे आताच सांगता येणार नाही.

पण महाराष्ट्रासह महत्वाच्या राज्यांमध्ये उत्पादनांतील घट २० ते २५ टक्क्यांपर्यंत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळं उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच राहील, अशी चर्चा बाजारात आहे.

बाजारात हरभरा आवक आता हळूहळू वाढत आहे. नेमकं याच काळात ग्राहक बाजारात हरभरा दर वाढत आहेत. यावरून हरभरा उत्पादनात घट झाली, असं म्हणायला जागा आहे.

हरभरा बाजारात स्टाॅकिस्टही काही प्रमाणात सक्रिय झाल्याचं सांगितलं जातं. देशात यंदा तूर, मूग आणि उडदाच्या दरात तेजी आहे. त्यामुळे हरभऱ्याला उठाव मिळू शकतो.

काय राहील स्थिती?

गेल्या हंगामात हरभऱ्याने हमीभावाचा टप्पाही गाठला नव्हता. त्यामुळं व्यापारी आणि स्टाॅकिस्ट हरभरा स्टाॅक करण्यास इच्छूक नव्हते. पण यंदा बाजारात सकारात्मकता दिसत आहे. नाफेडनेही बाजारात खरेदी सुरु केली.

पुढील काळात देशातील उत्पादनात किती घट झाली हे स्पष्ट होईल. यामुळं हरभरा दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज आहे.

Chana Market
Chana Procurement : हरभरा नोंदणीकृत आठ हजारांपैकी केवळ ५२ शेतकऱ्यांना एसएमएस

सध्याची दरपातळी

सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळं शेतकरी नाफेडला जास्तीत जास्त माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. नाफेडच्या खरेदीमुळं खुल्या बाजारात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा दिसली.

मार्चनंतर बाजारात हरभरा आवक जास्त वाढेल. त्यामुळं आवकेच्या काळात दरात जास्त सुधारणा अपेक्षित नाही. मात्र आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com