Global Sugar Price : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात घट

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत सध्या कच्च्या व पक्क्या या दोन्ही साखरेच्या दरात घट झाली आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market Sugar Rate) गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत सध्या कच्च्या व पक्क्या या दोन्ही साखरेच्या दरात (Sugar Price) घट झाली आहे. येणाऱ्या हंगामात भारत, ब्राझील आणि थायलंड या तिन्ही देशांमध्ये साखर उत्पादनवाढीचा (Sugar Production) अंदाज व्यक्त होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती घसरत आहेत. (Decline In Sugar Price In International Market)

Sugar Export
Sugar Mills: बहुतांश कारखान्यांकडून साखर उतारा प्रमाणपत्रे सादर

तिन्ही देशांच्या साखर उद्योगात काम करणाऱ्या प्रमुख संस्थांनी येत्या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केला आहे. याचा प्रतिकूल परिणाम साखर बाजारावर होत असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांमध्ये कच्च्या साखरेचे दर १२ टक्क्यांनी तर पक्क्या साखरेचे दर ८ टक्क्यांनी घसरले आहेत. साखरेच्या उत्पादनवाढीच्या अंदाजाबरोबरच ब्राझील व भारतीय चलनामध्ये होत असलेली घटही दर घसरणीला कारणीभूत ठरत असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

Sugar Export
Sugar Export: अतिरिक्त साखर निर्यातीला हिरवा कंदील?

रशिया युक्रेंनचे युद्ध झाल्यापासून कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडले होते. साहजिकच याचा परिणाम बहुतांश शेतीमालाचे दर वाढण्यावर झाला. या काळात साखरेच्या दरातही मोठी वाढ दिसून आली. याचा फायदा भारतीय साखरेलाही झाला. मार्च-एप्रिलमध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात जवळजवळ सारखेच दर असल्याची परिस्थिती होती यामुळे अनुदानाव्यतिरिक्तही साखर कारखान्यांनी साखर निर्यात केली.

मे पासून घट

मे महिन्यापासून मात्र कच्च्या व पक्क्या या दोन्ही साखरेच्या दरात हळूहळू घसरण होण्यास सुरुवात झाली. १३ एप्रिलला कच्च्या साखरेचा दर २०.५० सेंट प्रतिपौंड इतका उच्चांकी होता. तर याच कालावधीत पक्क्या साखरेला ५९९.६० डॉलर प्रतिटन इतका दर होता. या दोन महिन्यांनंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजार असंतुलित राहिला. कधी कमी तर कधी जास्त असा साखरेचा दर राहिला. रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता ओसरू लागल्यानंतर साखरेचे भावही कमी झाले. यातच पुन्हा मंदी येणार, असे वातावरण साखर बाजारात तयार झाल्याने या सर्वांचा विपरीत परिणाम साखर दरावर झाला.

दर वाढणार की कमी होणार?

एक जुलैला ऑक्टोबर न्यूयॉर्क जागतिक वायदेबाजारात कच्च्या साखरेला १८.०७ सेंट प्रतिपौंड दर होता. ऑगस्ट लंडन व्हाइट शुगर वायदेबाजारात रिफाइंड व्हाइट शुगर ५४९.४० डॉलर प्रतिटन दर होता. येणाऱ्या काळात ब्राझील इथेनॉलला किती पसंती देते आणि भारतातून केंद्राचे साखर निर्यातीबाबत काय निर्णय होतात, यावरही साखरेची उपलब्धता बाजारात अवलंबून असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. यावरच भविष्यात साखरेचे दर वाढतात की कमी होतात हे सांगता येईल, असे व्यापारी सूत्रानी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com