कापूस, हरभरा, हळदीच्या किमतींत घट

कापूस, सोयाबीन व टोमॅटो यांच्या किमती उतरत्या होत्या. मुगाच्या किमती प्रति क्विंटल रु. ६,२०० ते रु. ६,५०० या दरम्यान होत्या.१५ जुलै पासून NCDEX मध्ये हळद व इतर मसाल्यांच्या पदार्थांमध्ये ऑप्शन व्यवहार सुरू झाले.
Agriculture Commodity
Agriculture CommodityAgrowon

डॉ. अरुण कुलकर्णी

या महिन्यातील कापूस (Cotton), हळद (Turmeric) , हरभरा व तूर यांची आवक उतरती आहे. मका, टोमॅटो व मूग यांची आवक वाढती आहे. कांद्याची साप्ताहिक आवक ३.४१ लाख व टोमॅटोची आवक १.१५ लाख टनच्या आसपास आहे. टोमॅटोच्या आवकेत कर्नाटकचा हिस्सा ४१ टक्के आहे.

मुगाच्या आवकेत मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश यांचा एकूण हिस्सा ९१ टक्के आहे. मक्याच्या आवकेत सुद्धा उत्तर प्रदेशचा सहभाग ९० टक्क्यांहून अधिक आहे. सोयाबीनच्या किमती उतरत असल्याने आवक वाढत आहे. गेल्या महिन्यात मका, हळद, हरभरा व तूर यांच्या किमती वाढत होत्या. कापूस, सोयाबीन व टोमॅटो यांच्या किमती उतरत्या होत्या. मुगाच्या किमती प्रति क्विंटल रु. ६,२०० ते रु. ६,५०० या दरम्यान होत्या.१५ जुलै पासून NCDEX मध्ये हळद व इतर मसाल्यांच्या पदार्थांमध्ये ऑप्शन व्यवहार सुरू झाले.

या सप्ताहातील किमतीतील चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जून महिन्यात घसरत होते. जुलै महिन्यातसुद्धा ही घसरण चालू आहे. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.५ टक्क्याने वाढून रु. ४१,५०० वर आले आहेत. ऑगस्ट डिलिव्हरी भाव रु. ४१,९९० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) १.२ टक्क्याने घसरून रु २,१०० वर आले आहेत. नवीन वर्षासाठी कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती जून महिन्यात वाढत होत्या. जुलै महिन्यातसुद्धा त्या वाढत आहेत. या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,३०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑगस्ट डिलिव्हरी) किमती रु. २,३०९ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. २,३२९ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. १,९६२ जाहीर झाला आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती जून महिन्यात घसरत होत्या. जुलै महिन्यातसुद्धा त्या उतरत आहेत. या सप्ताहात स्पॉट किमती रु. ८,०६३ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती ०.१ टक्क्याने वाढून रु. ७,७०६ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जूनमध्ये वाढत होत्या. जुलै महिन्यात मात्र त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्याने घसरून रु. ४,७५७ वर आल्या आहेत. हमीभाव रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती जुलै महिन्यात वाढत आहेत. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ६,२७५ होती; या सप्ताहात ती १.२ टक्क्याने वाढून रु. ६,३५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. तो गेल्या वर्षापेक्षा ६.६ टक्क्यांनी अधिक आहे. मुगाची आवक वाढती आहे.

कांदा

कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,३७१ होती; या सप्ताहात ती ५.२ टक्क्यांनी घसरून रु. १,३०० वर आली आहे. कांद्याच्या किमती जुलै महिन्यात घसरत आहेत.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती परत घसरू लागल्या आहेत. टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहात रु. १,४८३ होती; या सप्ताहअखेर ती १,४८३ रु. पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक जून व जुलै महिन्यात वाढती आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) जून महिन्यात वाढत होती. याही महिन्यात किमती वाढत आहेत. तुरीची किमत गेल्या सप्ताहात रु. ६,६८० वर आली होती. या सप्ताहात ती ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ६,५२५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० जाहीर झाला आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) जून महिन्यात उतरत होती. जुलै महिन्यातसुद्धा किमती उतरत आहेत. या सप्ताहात स्पॉट किमत ०.७ टक्क्याने घसरून रु. ६,१३८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० जाहीर झाला आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com