Cotton Rate : देशांतर्गत बाजारात कापूस दरात सुधारणा

कापसाच्या दरात मागील पाच ते सहा दिवसांपासून चढ-उतार सुरु होते. तर देशांतर्गत बाजारात आज कापसाच्या दरात सुधारणा झाली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (Cotton Rate) आजही काहीशी घट झाली. मात्र देशांतर्गत बाजारात कापूस दरातील घट आज थांबली. आज अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहयाला मिळाली. पण कापूस दरातील चढ-उतार पुढील महिनाभर कायम राहू शकतात. मग या स्थितीत कापसाला काय दर मिळू शकतो? आज कापसाच्या दरात किती सुधारणा झाली? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Cotton Rate
Cotton Rate : कापूस दर कधी वाढतील?

1. सोयाबीनच्या दरात सुधारणा

जवळपास आठवडाभराच्या घसरणीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाीबन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज सोयाबीनचे वायदे १४.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. तर सोयातेलाचे दरही वाढून ७१.६१ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले. देशातही अनेक बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल ५ हजार ४०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्याने देशातही सोयाबीनचे दर सुधारण्याची शक्यता आहे. यंदा सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
 

2. उडदाचे दर टिकून

देशातील बाजारात आता नवीन उडदाची आवक वाढली आहे. त्यातच सरकारने म्यानमारमधून आयात वाढीला प्रोत्साहन दिले. सरकारही आयात उडदाची खरेदी करत आहे. याचा परिणाम देशातील बाजारावर झाल्याचे दिसत आहे. सध्या देशांतर्गत बाजारपेठांत उडदाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. उडदाचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज उडीद प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय. 

Cotton Rate
Cotton Rate : अनेकांचे फरदड कापूस पीक उभेच राहणार

3. केळीचे दर दबावातच

देशातील बाजारात सध्या केळीची आवक घटलेली आहे. मात्र केळीला मागणी कायम आहे. देशातील बहुतांशी भागात थंडी वाढल्याने केळीला उठावही जास्त मिळतोय. मात्र दर दबावातच आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांकडे केळी खूपच कमी उपलब्ध आहे. व्यापारी आणि स्टाॅकिस्ट यांनी साठवून ठेवलेली केळी जास्त प्रमाणात बाजारात येत असल्याचं केळी व्यापाऱ्यांनी सांगितलं. 

4. गव्हाचे दर तेजीत देशात गव्हाचे दर तेजीत आले आहेत. गव्हाची आवक मंदावल्याचा हा परिणाम आहे. मागील रब्बी हंगामात देशातील गहू उत्पादन घटले होते. तसेच निर्यातबंदीच्या आधी देशातून मोठ्या प्रमाणात गहू निर्यात झाला. खुल्या बाजारात गव्हाचे दर चढे होते. त्यामुळे सरकारी गहू खरेदी घटली. परिणामी सध्या गव्हाची बाजारातील आवक कमी झाली आहे. गव्हाला २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. रब्बीतील नवा गहू बाजारात येईपर्यंत दर तेजीतच राहतील, असा अंदाज गहू व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
 

5. कापसाच्या दरात मागील पाच ते सहा दिवसांपासून चढ-उतार सुरु होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे नरमले. मात्र कालच्या तुलनेत दरात आज वाढ पाहायला मिळाली. आज कापसाचे वायदे ८२.१८ सेंट प्रतिपाऊंडने पार पडले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरावर चीनमधील कोरोना स्थिती, वाढती महागाई आणि इंधनाचे वाढलेले दर याचा परिणाम होत आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोना निर्बंध कडक होत आहेत. याचा परिणाम चीनच्या कापूस मागणीवर होण्याच्या भीतीने दर तुटले होते. ते आता काहीसे उभारी घेत आहेत. तर देशातील बाजारात आज कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारात कापसाचे दर मागील सहा दिवसांमध्ये सरासरी ५०० रुपयाने नरमले होते. तर आज अनेक बाजारांमध्ये कापूस दर क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी सुधारले होते. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ३०० ते ८ हजार ८०० रुपये दर मिळाला. सध्या कापसाच्या दरात चढउतार सुरु आहेत. कापूस दरातील ही स्थिती पुढील महिनाभर राहण्याचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांनी कापूस विक्री टप्प्याटप्प्याने केल्यास बाजारातील आवक मर्यादीत राहील. त्यामुळं दर जास्त तुटणार नाहीत. असं झाल्यास जानेवारीपासून कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com