NBHC Procurement : एनबीएचसीकडून थेट शेतीमाल खरेदी केंद्रे सुरु

नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन अर्थात एनबीएचसी ही कृषी शेतीमाल मुल्यसाखळीत काढणीपश्चात सेवा पुरवणारी देशातील अग्रगण्य संस्था आहे.
Paddy Producers
Paddy ProducersAgrowon

Pune News : शेतीमाल काढणीपश्चात मुल्यसाखळीत मोलाची भुमिका पार पाडणाऱ्या नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन अर्थात एनबीएचसीने आता थेट शेतीमाल खेरदीसाठी पुढाकार घेतला आहे. एनबीएचसीने भात (Rice) खरेदीसाठी बिहार, राजस्थामध्ये तर मध्य प्रदेशात मका खरेदीसाठी (Maize) केंद्रे सुरु केली आहेत.  

नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन अर्थात एनबीएचसी ही कृषी शेतीमाल मुल्यसाखळीत काढणीपश्चात सेवा पुरवणारी देशातील अग्रगण्य संस्था आहे. एनबीएचसीने आता थेट शेतीमाल खेरदीसाठी देशात तीन केंद्रे सुरु केली आहेत.

राजस्थानमधील बुंदी आणि बिहारमधील सासाराम या ठिकाणी भात खरेदी केली जाणार आहे. तर मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील केंद्रावर मक्याची थेट खरेदी केली जाणार आहे.

Paddy Producers
Millets Market : मका, ज्वारी, बाजारी, नाचणीची खरेदी वाढवणार

एनबीएचसीने मागील खरिप हंगामात शेतकरी आणि प्रक्रियादार किंवा निर्यातदारांना थेट जोडण्यासाठी प्रायोगिक तत्वावर थेट खरेदी केंद्रे सुरु केली होती. यातून ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करण्यात आला.

छिंदवाडा येथील केंद्रावर महिंद्रा ग्रुपने थेट शेतकऱ्यांकडून ३८ हजार क्विंटल मका, बासमती तांदूळ तसेच सोनम आणि कटारणी तांदूळ खरेदी केला होता. यातून एक कोटींपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झाला.

एनबीएचसीने २०२१ मध्ये शेतीमाल काढणीपश्चात मुल्य साखळी विकसित करण्यासाठी कृषी सेतू नावाने ई मार्केट प्लॅटफाॅर्म सुरु केला. एनबीएचसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कृषी व्यापार-व्यवसाय प्रमुख दीपक कुमार सिंह म्हणाले की, बदलत्या कृषी धोरणामुळे शेतकऱ्यांना नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत.

एनबीएचसीने बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील थेट खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना शेतीमालचे मोजमाप, गुणवत्ता निर्धारण, बाजार लिंकेजची उपलब्धता तसेच कर्जाचे पर्याय पारदर्शकतेसह उपलब्ध करून दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या मदतील किसान साथी

शेतकऱ्यांना एनबीएचसीच्या केंद्रांपर्यंत शेतीमाल सहजपणे आणता यावा यासाठी किसान साथी नेमले जाणार आहेत. हे किसान साथी बांधापासून खरेदी केंद्रांपर्यंत शेतीमाल आणण्यासाठी शेतकऱ्यांना लाॅजिस्टीकच्या सुविधा पुरविणार आहेत.

सध्या ५० किसान साथी नेमण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून गावपातळीवर व्यावसायिकता विकसित केली जाणार आहे, असेही दीपक कुमार सिंह यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com