हळदीची जीएसटीच्या जाचातून सुटका

कच्ची हळद आणि प्रक्रिया केलेल्या हळदीतील गुणधर्म सारखे असल्याच्या अहवालाचा दाखला देण्यात आला. शेतकऱ्यांकडून बाजारात ताजी कच्ची हळद विकण्यात येत नाही, कापणीनंतरच्या प्रक्रिया केल्यावरच बाजारात ती विक्रीसाठी दाखल करण्यात येत असल्याचा युक्तिवाद ॲपिलेटमध्ये मान्य करण्यात आला.
हळदीची जीएसटीच्या जाचातून सुटका
TurmericAgrowon

शेतकऱ्यांनी वाळवलेली, पॉलिश केलेली हळद हे कृषी उत्पादन असून त्याच्यावर जीएसटी लागू होत नसल्याचा निर्वाळा महाराष्ट्र ॲपिलेट ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगने (MAAAR) दिला आहे. त्यामुळे अखेर हळदीची जीएसटीच्या कचाट्यातून सुटका झाली आहे.

हळदीवर ५ टक्के जीएसटी आकारला जात असल्याने एमएएएआरचा (MAAAR) हा निर्वाळा महत्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगने (MAAR) वाळलेली,पॉलिश केलेली हळद ही कृषी उत्पादनाच्या व्याख्येत बसत नसल्याचे सांगत त्यावर ५ टक्के जीएसटी लागू होईल, असे स्पष्ट केले होते.

Turmeric
केंद्र सरकारची १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी

कृषी उत्पादन बाजार समितीतील (APMC) कमिशन एजंटने या निर्णयाविरोधात महाराष्ट्र ॲपिलेट ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगकडे (MAAAR) दाद मागितली होती.महाराष्ट्र ॲपिलेट ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगने (MAAAR) महाराष्ट्र ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगचा (MAAR) निर्णय बाजूला सारत वाळलेल्या, पॉलिश केलेल्या हळदीला कृषी उत्पादन ठरवले आहे.

ताजी हळद ओलसर आणि काळ्या रंगाची असते. त्यामुळे ती नाशवंत असते. बाजारात विक्रीसाठी दाखल करण्यापूर्वी शेतकऱ्यांना या कच्च्या हळदीवर उकळणे, वाळवणे, पॉलिश करणे आदी प्रक्रिया करणे गरजेचे असते, असे निरीक्षण ॲपिलेटच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नोंदवले. त्यामुळे वाळवलेली,पॉलिश केलेली हळद प्रक्रिया केलेल्या ही कृषी उत्पादनात मोडते, असा स्पष्ट निर्वाळा महाराष्ट्र ॲपिलेट ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगने (MAAAR) दिला.

Turmeric
सेंद्रिय कर्बाचे घटते प्रमाण चिंताजनक

महाराष्ट्र ॲपिलेट ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगने (MAAAR) यासंदर्भात प्रयोगशाळेच्या अहवालाचा दाखला दिला. कच्ची हळद आणि प्रक्रिया केलेल्या हळदीतील गुणधर्म सारखे असल्याच्या अहवालाचा दाखला देण्यात आला. शेतकऱ्यांकडून बाजारात ताजी कच्ची हळद विकण्यात येत नाही, कापणीनंतरच्या प्रक्रिया केल्यावरच बाजारात ती विक्रीसाठी दाखल करण्यात येत असल्याचा युक्तिवाद ॲपिलेटमध्ये मान्य करण्यात आला.

या युक्तिवादानंतर महाराष्ट्र ॲपिलेट ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगने (MAAAR) हळद ही कृषी उत्पादन असल्याचे सर्व निकष पूर्ण होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच पॉलिश केलेल्या हळदीवर जीएसटी लागू होत नसल्याचा निर्वाळा देण्यात आला.

अपिलात कृषी उत्पादन समितीचे कमिशन एजंट जीएसटीच्या कक्षेत मोडतात का? आणि त्यांना जीएसटी अनुसार नोंदणी करावी लागते का? या दोन्ही प्रश्नांचा विचार करण्यात आला. महाराष्ट्र ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगने (MAAR) या दोन्ही प्रश्नांचे उत्तर होकारार्थी दिले होते. मात्र महाराष्ट्र ॲपिलेट ॲथॉरिटी फॉर ऍडव्हान्स्ड रुलिंगने (MAAAR) कमिशन एजंटला जीएसटी लागू होत नसल्याचा खुलासा केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com