Sugarcane: पावसामुळे आडसाली ऊस लागवड खोळंबली

जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. ऊस लागवड (Sugarcane Cultivation) थांबली होती. त्यातूनही शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून ऊस लागवड केली आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon

सांगलीः जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील आडसाली ऊस लागवड (Sugarcane Cultivation) खोळंबली असून, आतापर्यंत १४ हजार ३५१ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. जिल्ह्यात शिराळा तालुक्यात ३७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात आडसाली उसाची लागवड मे महिन्यापासून सुरू होते. पूर पट्ट्यात मे महिन्यात ऊस लागवड केली जाते. जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. ऊस लागवड (Sugarcane Cultivation) थांबली होती. त्यातूनही शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून ऊस लागवड केली आहे.

जुलै महिन्यापासून जिल्‍ह्यातील इतर भागांत आडसाली ऊस लागवडीसाठी (Sugarcane Cultivation) शेतकऱ्यांनी नियोजन केले. वाळवा आणि पलूस तालुक्यांत आडसाली उसाच्या लागवडी झाल्या. वाळवा तालुक्यात ८ हजार ८४०, तर पलूस तालुक्यात ४ हजार ६५५ हेक्टरवर लागवड झाली आहे.

मात्र गेल्या दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांत शेतकऱ्यांनी पावसातच ऊस लागवड (Sugarcane Cultivation) सुरू केली आहे. तर काही भागांत पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड करण्याचे थांबवले आहे. शिराळा तालुक्यात ऊस शेतीत वारणा नदीचे पाणी घुसले आहे. त्यामुळे ऊस वाढीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरूच आहे. त्यामुळे वारणा धरणातून ८५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Sugarcane Cultivation
Heavy Rain : भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये ः मिरज ७.५ (१३६.७), जत ६.७ (१२४.५), खानापूर-विटा १२.२ (१३५.३), वाळवा-इस्लामपूर १७.१ (१८२.९), तासगाव १२.६ (१२५.९), शिराळा ३७.६ (४४८.५), आटपाडी ७.३ (९०.३), कवठे महांकाळ ६.६ (१२०.१), पलूस ११.१ (१११.८), कडेगाव १७.७ (१४२.३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com