मागणी वाढल्याने तुरीचे दर तेजीत

१३ जुलैनंतर प्रक्रिया उद्योजकांच (Processing Industry) मागणी वाढली. त्यामुळे दरात तेजी अनुभवली गेली. ७३०० ते ७३४१, ६८०० ते ७७०० असा दर मध्यंतरी तुरीला मिळाला.
Tur
TurAgrowon

नागपूर : प्रक्रिया उद्योजकांची वाढती मागणी आणि नव्या तुरीची आवक होण्यास आठ महिन्यांचा कालावधी आहे. परिणामी, बाजारात तुरीच्या दरात चांगली तेजी अनुभवली जात आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीला ७०००, तर अमरावती बाजार समितीत ७७४० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला.

कळमना बाजार समितीत जुलै महिन्याच्या सुरुवातीला ८९५ क्विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली होती. ४२०० ते ४५१८ रुपयांनी तुरीचे व्यवहार झाले. त्यानंतरच्या काळात तुरीचे दर ६२५० ते ६७०० रुपयांवर स्थिरावले होते. १३ जुलैनंतर प्रक्रिया उद्योजकांच (Processing Industry) मागणी वाढली. त्यामुळे दरात तेजी अनुभवली गेली. ७३०० ते ७३४१, ६८०० ते ७७०० असा दर मध्यंतरी तुरीला मिळाला.

त्यानंतरच्या काळात ६४५० ते ७००० असा दर तुरीला मिळत होता. सध्या तुरीची आवक अवघी २०० क्विंटलपर्यंत मर्यादित झाली आहे. दुसरीकडे डाळ मिल उद्योगाची मागणी वाढती असल्याने त्याची पूर्तता इतक्या अत्यल्प आवकच्या माध्यमातून होणे शक्य नाही. त्यामुळे दरात या पुढील काळात अधिक तेजी येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अकोला बाजार समितीत देखील सात हजार ७०० रुपयांवर तुरीचे दर होते.

अमरावती बाजार समिती (Market Committee) देखील तुरीच्या दरात यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच तेजी अनुभवली गेली आहे. तुरीला ७७४० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. तुरीचे हंगामात ६००० ते ६३०० वरच भाव स्थिरावले होते. ‘नाफेड’कडून देखील शासकीय खरेदी सुरू झाली. मात्र बाजार समितीमध्ये (APMC) मिळणारा चांगला दर आणि रोखीने होणारे पेमेंट यामुळे शेतकऱ्यांचा ओढा नाफेड केंद्राऐवजी बाजार समितीकडे होता. अमरावती जिल्ह्यात यंदा १.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर तूर लागवडीचे नियोजन होते. प्रत्यक्षात १.५ लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे.

मिल मालकांकडून मागणी वाढली आहे. तुलनेत आवक कमी सोबतच नव्या तुरीची आवक होण्यास आठ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी आहे. त्यामुळे तुरीच्या भावात तेजी अनुभवली जात आहे.

दीपक विजयकर, सचिव, बाजार समिती अमरावती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com