Soybean Market : सोयापेंड निर्यात वाढल्यानं सोयाबीनचे भावही वाढणार

देशातून सध्या सोयापेंड निर्यात वाढली. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात सुधारणा दिसत आहे.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

Pune Soybean News : सोयाबीन बाजारात (Soybean Market) काहीशी सुधारणा दिसत आहे. देशातून सोयापेंड निर्यात वाढली. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलासह (Soya oil) पामतेलाच्या (Palm oil) दरात वाढ दिसत आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) पुढील काही दिवसांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.

यामुळं सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळू शकतो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनचे सरासरी भाव ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोहचू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातून सध्या सोयापेंड निर्यात वाढली. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात सुधारणा दिसत आहे. यामुळं सोयाबीन बाजाराला मदत मिळू शकते. यंदा गेल्यावर्षीपेक्षा सोयापेंड निर्यात तिप्पट होण्याची शक्यता आहे.

पहिल्या चार महिन्यांमध्येच सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाल्याचं दिसतं. सोपानं सोयापेंड निर्यात ६५ टक्क्यांनी वाढल्याचं म्हटलं. तर साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानेही सोयापेंड निर्यात ७० टक्क्यांनी अधिक राहिल्याचं स्पष्ट केलं.

Soybean Rate
Soybean Rate : राज्यातील सोयाबीन बाजारात आज काय घडलं? भाव वाढले का घटले?

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरात सुधारणा दिसत आहे. मागील दोन आठवड्यांपासून पामतेलाचे दर वाढले. पामतेलाने आता ४ हजार रिंगीटचा टप्पा पार केला. काही दिवसांपासून पामतेल ४ हजार ते ४ हजार २०० रिंगीटच्या दरम्यान आहेत.

इंडोनेशियानं पामतेल निर्यातीवर काही बंधन आणली. त्यामुळं पामतेलाचे दर सध्या वाढले आहेत. तसचं पामतेलाच्या दरातील वाढ कायम राहू शकते, असाही अंदाज बाजारातून व्यक्त केला जातोय.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयापेंडचे दर तेजीत आहेत. त्यामुळं भारतीय सोयापेंड स्वस्त झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय सोयापेंड जवळपास १५ ते २० डाॅलरनं स्वस्त पडते. त्यामुळं व्हिएतनाम, बांगलादेश आणि नेपाळकडून मागणी वाढली.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विक्रमी निर्यात होऊ शकते, असा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत. या दोन महिन्यांमध्येच ५ ते ६ लाख टन सोयापेंड निर्यात होऊ शकते.

सोयापेंड निर्यातीसाठी सोयाबीन खेरदी वाढणार

मार्चमध्ये निर्यातीसाठीचे जास्त सौदे झाले. म्हणजेच मार्चमध्ये निर्यात जास्त होईल. निर्यातीचे सौदे पूर्ण करण्यासाठी उद्योगांना सोयाबीन गाळप वाढवावं लागेल. म्हणजेच जास्त सोयाबीन खरेदी करावी लागणार. त्यामुळं या काळात सोयाबीन दरात वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Soybean Rate
Soybean Market : सोयातेल आयात वाढल्यानं दरवाढीच्या मार्गात अडथळा | Agrowon | ॲग्रोवन

देशातील दरपातळी

देशातील बाजारात आज जवळपास ३ लाख ३० हजार क्विंटल आवक झाली होती. महाराष्ट्रातील आवक १ लाख ५० हजार टनांच्या दरम्यान होती.

आज सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ५५० ते ५ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान होते.

दरपातळी किती होणार?

सोयाबीनची दरपातळी गेल्या आठवड्यापासून काहीशी सुधारली. त्यात मार्च महिन्यात आणखी वाढ होऊ शकते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयातेलाचे वाढणारे दर आणि सोयापेंड निर्यातीची वाढलेली गती, यामुळं सोयाबीनची खरेदी वाढणार आहे. त्यामुळं सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढेल.

तर यापुढील काळात सोयाबीन दरात जास्त नरमाईची शक्यता नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री करावी, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com