Soybean Market : सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयातही बंद होणार; सोयाबीनला आधार मिळेल का?

देशात सोयातेलाचे दर कमी झाल्यानंतर विदेश व्यापार महासंचालनालयाने ११ जानेवारी २०२३ रोजी अद्यादेश काढून १ एप्रिल २०२३ पासून कच्च्या सोयातेलाची शुल्कमुक्त आयात बंद केली.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Soybean Price : सध्या देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात (Soybean Rate) चढ उतार सुरु आहेत. देशात आज बाजार (Soybean Market) काहिसा स्थिरावला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दरात काहीशी वाढ दिसली. देशातील सोयाबीन बाजारावर आधीपासून खाद्यतेलाचा (Edible Oil) दबाव राहिला.

कोणत्याही शुल्काविना आयात होत रहिल्यानं सोयातेलाचे दर (Soya oil Rate) कमी होते. पण आता केंद्रानं सोयातेलापाठोपाठ सूर्यफुल तेलाची (Soybean Oil Import) शुल्कमुक्त आयातही बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सोयाबीन आणि मोहरी बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरवाढीचा भडका उडाल्यानंतर देशातही भाव वाढले होते. त्यामुळं केंद्र सरकारने २४ मे २०२२ रोजी २० लाख टन कच्चे सोयाबीन लाख टन आणि २० लाख टन कच्चे सूर्यफुल तेल कोणत्या शुल्काविना आयातीला परवानागी दिली होती.

दोन वर्षांसाठी ही परवानगी देण्यात आली होती. मात्र मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाले. रशिया आणि युक्रेनने सूर्यफुल तेलाचा स्टाॅक कमी करण्यासाठी दर कमी केले.

परिणामी भारतात जानेवारीत विक्रमी सूर्यफूल तेल आयात झाली. याचा दबाव देशातील सोयाबीन आणि मोहरी तेलावर आला.

Soybean Market
Edible Oil : यंदा देशात दुप्पट खाद्यतेलाचा साठा

देशात सोयातेलाचे दर कमी झाल्यानंतर विदेश व्यापार महासंचालनालयाने ११ जानेवारी २०२३ रोजी अद्यादेश काढून १ एप्रिल २०२३ पासून कच्च्या सोयातेलाची शुल्कमुक्त आयात बंद केली. म्हणजेच १ एप्रिलपासून कच्चे सोयातेल आयातीवर शुल्क लागू होणार आहे.

कच्च्या सूर्यफुल तेलाची आयात मात्र कायम ठेवली होती. देशात खाद्यतेलाची आयात वाढल्याने देशांतर्गत बाजारावर दबाव येत होता. त्यामुळं उद्योगांकडूनही सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात बंद करण्याची मागणी येत होती.

Soybean Market
sunflower Cultivation : सूर्यफूल लागवडीला शेतकरी का देतायत पसंती?

सोयाबीन उत्पादकांनाही दिलासा

देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले. शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने सोयाबीन मागे ठेवले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे स्टाॅक आहे. तसचं मोहरी उत्पादनही यंदा वाढण्याचा अंदाज आहे. सध्या मोहरीचे दर हमीभावाच्या दरम्यान आहेत.

शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात बंद करण्याची मागणी केली जात होती, असे साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितलं.

एक एप्रिलपासून लागणार आयातशुल्क

विदेश व्यापार महासंचलनालयाने बुधवारी, १ मार्च रोजी अद्यादेश काढून हा निर्णय घेतला. ३१ मार्च २०२३ नंतर सूर्यफुल तेल आयात शुल्काविना होणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले.

केंद्राने सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळं सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो. देशात खाद्यतेलाचा स्टाॅक साठल्यानं त्याचा दबाव सोयाबीनवरही होता. पण आता खाद्यतेल आयातीवर शुल्क लागणार असल्यानं सोयाबीन आणि मोहरीलाही आधार मिळू शकतो.

तेलबिया बाजाराला आधार

केंद्रानं १ एप्रिलपासून कच्चे सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात बंद केली. पण खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करण्याची गरज आहे. सध्या खाद्यतेल बाजाराकडून सोयाबीनला अपेक्षेप्रमाणं आधार मिळत नाही.

त्यामुळं प्रक्रियादारांनी आयातशुल्क वाढविण्याची मागणी लावून धरली. आयातशुल्कात वाढ केल्यास सोयाबीन दरालाही आधार मिळू शकतो. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

सध्या सोयाबीन दबावात असले तरी लवकरच सरासरी ५ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Soybean Market
Soybean Rate : सोयाबीन दर वाढीसाठी अनुकूल स्थिती
सूर्यफुल तेलावर आयात शुल्क लागू होईल. शुल्कमुक्त आयात बंद केल्याने देशातील खाद्यतेल बाजाराला आधार मिळेल. उद्योगांना स्पर्धा करता येईल. तसेच देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईल.
भारत मेहता, कार्यकारी संचालक, साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com