आयात वाढूनही खाद्यतेलांचे दर स्थिर

ग्राहकांना दिलासा नाहीच
आयात वाढूनही खाद्यतेलांचे दर स्थिर
Edible Oil Agrowon

नागपूर : इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवरील (Palm Oil Export) बंदी मागे घेतल्यानंतर सुमारे दोन लाख टन कच्चे पाम तेल (Raw Palm Oil) भारतात पाठवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत भारतात पाम तेलाची (Palm Oil) उपलब्धता वाढेल. त्यामुळे इतर खाद्यतेलाच्या किमतीही (Edible Oil Price) कमी होतील, असे बोलले जात होते; मात्र खाद्यतेलाच्या दरात घट न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनपर्यंत किरकोळ बाजारात पाम तेल उपलब्ध होईल. यामुळे साबण, शॅम्पू, बिस्किटे आणि चॉकलेट यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती कमी होतील; मात्र त्याचा ग्राहकांना लाभ होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. भारत सुमारे एक लाख ३० हजार टन खाद्यतेल आयात करतो, त्यापैकी सुमारे ८५ लाख टन तेल किंवा सुमारे ६३ टक्के पाम तेल आहे. यातील सुमारे ४५ टक्के पाम तेल इंडोनेशियातून आणि उर्वरित मलेशियातून येते. अद्याप इंडोनेशियातील खेप भारतात आलेली नसल्याने खाद्यतेलाच्या किमती खाली आलेल्या नाहीत. केंद्र सरकार मात्र दर कमी होतील, असे म्हणत आहे; मात्र वाढलेले इंधनाचे दर आणि वाहतुकीच्या दरात झालेल्या वाढीमुळे जनतेला मोठा दिलासा मिळेल, अशी शक्यता कमीच आहे. भारतातील लोक सध्या महागाईचा सामना करत आहेत.

भारत आपले बहुतेक पाम तेल इंडोनेशियातूनच आयात करतो. इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे देशातील पाम तेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे. पाम तेलाचा वापर मुख्यतः स्वयंपाकात केला जातो. हे इतर तेलांमध्येदेखील मिसळले जात असल्याने दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाजारात शुकशुकाट

महिन्याची सुरुवात असतानाही बाजारात शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे बाजारातील सर्वच धान्यांसह तेलाचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत. सध्या ऑनलाइन, मॉल संस्कृती शहरात बळावू लागली आहे. त्याचाही फटका पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळेही बाजारातील गर्दी कमी झाल्याचे बाजाराचे अभ्यासक प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com