धान्यापासून इथेनॉल निर्मिती महागणार?

गहू आणि मक्याचे दर वाढल्यानंतर तुकडा तांदळाचेही दर वाढले आहेत. तांदळापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात आणि मक्यापासूनच्या इथेनॉलच्या दरात लिटरमागे ४ रुपयांची तफावत आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

धान्यापासून इथेनॉलची निर्मिती करणे महागणार असल्याची शक्यता आहेत. तेल विपणन कंपन्या धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या आसवनी प्रकल्पाकडून हे इथेनॉल खरेदी करत असतात. मात्र आता या कंपन्यांना हे इथेनॉल प्रति लिटर २ ते ४ रुपयांनी महाग मिळण्याची शक्यता आहे.

धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या आसवनी प्रकल्पांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे त्या इथेनॉलच्या किमतीत सरकारकडून वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारनेच त्यासाठी संमती दिली असल्याचे समजते.

सध्या तेल विपणन कंपन्या खराब धान्यापासून (तांदूळ) अथवा मक्यापासून तयार करण्यात आलेल्या इथेनॉलची ५२.९२ रुपये प्रति लिटर दराने खरेदी करतात. मात्र सध्या त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने इथेनॉल निर्मिती करणाऱ्यांनी विक्रीचा दर वाढवण्याचा आग्रह सरकारकडे धरला आहे.या दरवाढीच्या निर्णयामुळे सरकारच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या अभियानात अडसर निर्माण होणार नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

ल्या आठवड्यात यासंदर्भात कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखालील समितीची एक बैठक पार पाडली. या बैठकीत समितीने दरवाढीची मागणी तत्वतः मान्य केली असून याबाबतचा अंतिम निर्णय तेल विपणन कंपन्यांवर सोपवला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इथेनॉल मिश्रणाचे वाढते उद्दिष्ट लक्षात घेऊन कंपन्यांनी दरावाढीबाबतचा निर्णय घ्यावा, असेही सरकारतर्फे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

इथेनॉल निर्मितीसाठी धान्याचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेत केंद्रीय अन्न मंत्रालयाने धान्यापासून इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना भारतीय अन्न महामंडळाकडील (FCI) तांदळाचा राखीव साठा वापरण्याचा प्रस्ताव यापूर्वीच दिलेला आहे. मात्र संबंधित प्रकल्पांना हा तोडगा मान्य झाला नसल्याचेही सूत्रांनी नमूद केले आहे.

इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, धान्याची कमतरता आणि प्रत्यक्ष तेल कंपन्यांकडून मिळणारा अपुरा दर यामुळे धान्यापासून इथेनॉल निर्मिती परवडत नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

२०२०-२०२१ या इथेनॉल पुरवठा वर्षात खुल्या बाजारातील मक्याचा दर प्रति क्विंटल १४४५ रुपये होता. चालू इथेनॉल पुरवठा वर्षात बाजारातील मक्याचा दर १७३६ रुपये प्रति क्विंटलवर गेला आहे. खराब झालेल्या धन्याचे अथवा मक्याचे दर प्रत्येक राज्यांत वेगळे आहेत. त्यामुळे धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणे आर्थिकदृष्टया परवडत नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दरवर्षी इथेनॉलसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीनुसार इथेनॉल विक्रीच्या किमतीतही वाढ केली जाते. गहू आणि मक्याचे दर वाढल्यानंतर तुकडा तांदळाचेही दर वाढले आहेत. तांदळापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात आणि मक्यापासूनच्या इथेनॉलच्या दरात लिटरमागे ४ रुपयांची तफावत आहे. मक्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केल्यास तेल विपणन कंपन्यांकडूनही ते मान्य केले जाईल, अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com