रशियाकडून तेल आयातनिर्बंधास युरोपीय महासंघाची मान्यता

हंगेरी, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकियाचा अपवाद
रशियाकडून तेल आयातनिर्बंधास युरोपीय महासंघाची मान्यता
Oil ImportAgrowon

ब्रुसेल्स : युरोपीय महासंघाने (European Union) शुक्रवारी रशियाकडून तेलावरील आयातीस निर्बंध (Ban Oil Import) घालण्यास औपचारिक मान्यता दिली. रशियाच्या (Russia) प्रमुख बँकांवरील निर्बंधांनाही मान्यता दिली. महासंघाच्या मुख्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले, की रशियाकडून कच्च्या तेलाची आयात (Oil Import) सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल आणि आठ महिन्यांत इतर शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांवरही बंदी घातली जाईल.

हंगेरी, झेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे देशांचा या निर्णयाला अपवाद असेल. हे देश प्रामुख्याने रशियाच्या तेलपुरवठ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. बल्गेरिया आणि क्रोएशिया यांना विशिष्ट प्रकारच्या तेलासाठी रशियाकडून आयातीस तात्पुरती सवलतही मिळेल. या निर्णयामुळे युरोपमध्ये रशियाची ९० टक्के तेल निर्यात या वर्षांच्या अखेरीस थांबवली जाईल. युरोपियन महासंघ रशियाकडून सुमारे २५ टक्के तेल आयात करते. रशियाची सर्वांत मोठी बँक सबर बँक ऑफ रशिया, तसेच क्रेडिट बँक ऑफ मॉस्को, रशियन कृषी बँक आणि बेलारूसियन बँक फॉर डेव्हलपमेंट अँड रिकन्स्ट्रक्शन यांनाही ‘स्विफ्ट’ प्रणाली वापरण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com