गुजरातमध्ये हमीभावाने तूर खरेदीला मुदतवाढ

Tur Procurement- हमीभाव खरेदी योजनेतंर्गत सहभागी होण्यासाठी गुजरातमधील १८,५३५ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी होती, अशी माहिती गुजरात सरकारने दिली.
गुजरातमध्ये हमीभावाने तूर खरेदीला मुदतवाढ
Tur Procurement Agrowon

पुणेः गुजरातमध्ये तूर खरेदीची (Tur Procurement) मुदत १५ मे रोजी संपली होती. मात्र काही शेतकऱ्यांनी उशीरा तूर लागवड केल्याने काढणीही उशीरा झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी मुदतवाढीची गुजरातने मागणी केली होती. त्याला केंद्र सरकारने परवानगी देत हमीभावाने तूर खरेदीची मुदत ३० मे पर्यंत वाढवली.

हमीभाव खरेदी योजनेतंर्गत सहभागी होण्यासाठी गुजरातमधील १८,५३५ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी होती, अशी माहिती गुजरात सरकारने दिली. केंद्राने २०२१-२२ या वर्षासाठी तूरीसाठी प्रती क्विंटल ६,३०० रुपये किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभाव जाहिर केला होता. गुजरातमध्ये १०४ कोटी रुपयांची १६,४८० टन तूर खरेदी केली.

१५ फेब्रुवारीपासून गुजरातमधील गुजकोमासोल महासंघाने तुरीची हमीभावाने खरेदी सुरू केली होती. ज्यामध्ये आतापर्यंत ८६१७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याचे राज्य सरकारने निवेदनात सांगितले.

तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी संपली होती, मात्र केंद्राने त्यात हस्तक्षेप करून मुदतवाढ दिली आहे. गुजरातमधील काही भागात उशिरा तूर पेरणी करण्यात आली होती, त्यामुळे तूर काढणीला उशीर होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर केंद्राने तूर खरेदीसाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

तूर खरेदीला नव्याने मुदतवाढ देताना १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे. आता केंद्राने तूर खरेदीची मुदत ३० मे पर्यंत वाढवली आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी गुजकोमासोल महासंघामार्फत करण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com