Cotton Market : कापूस, सोयाबीनच्या किमतींत घसरण

गेल्या सप्ताहात होळीनिमित्त शेतीमालाची आवक कमी झाली होती. मात्र ती आता पुन्हा पूर्ववत झाली आहे. कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर आहे.
Cotton Market
Cotton Market Agrowon

फ्यूचर्स किमती ः सप्ताह- ११ ते १७ मार्च २०२३

गेल्या सप्ताहात होळीनिमित्त शेतीमालाची आवक कमी झाली होती. मात्र ती आता पुन्हा पूर्ववत झाली आहे. कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत्या पातळीवर स्थिर आहे.

तूर, हरभरा व हळद यांची आवक वाढत आहे. मका (Maize) व सोयाबीन (Soybean) यांची आवक कमी होत आहे. कांद्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

या सप्ताहात कापूस, मका, हळद व सोयाबीन यांच्या किमती घसरल्या. तुरीच्या किमती वाढल्या, तर हरभरा स्थिर होता. टोमॅटोच्या किमती आता वाढू लागल्या आहेत.

१७ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने घसरून प्रति खंडी रु. ६२,१२० वर आले होते. याही सप्ताहात ते १.८ टक्क्याने घसरून रु. ६०,९८० वर आले आहेत.

एप्रिल फ्यूचर्स भाव ०.७ टक्क्याने घसरून रु. ६१,४४० वर आले आहेत. जून फ्यूचर्स रु. ६२,५६० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात १.७ टक्क्याने घसरून रु १,५२८ वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा १ टक्क्याने घसरून रु. १,५१२ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५९५ आहेत.

कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत. सध्याचे बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. कापसाची आवक अजून वाढत्या पातळीवर आहे. भाव घसरत आहेत.

Cotton Market
Maize Market : खानदेशात मका दर कमाल २२५० रुपये प्रतिक्विंटल

मका

NCDEX मधील मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा, सांगली) जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्याने घसरून रु. २,०९४ वर आल्या आहेत.

फ्यूचर्स (एप्रिल डिलिव्हरी) किमतीसुद्धा ०.४ टक्क्याने घसरून रु. २,१०९ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,१३४ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.९ टक्का अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. मक्याची आवक कमी होत आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्का वाढून रु. ६,९८५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी घसरून रु. ६,७८७ वर आल्या आहेत.

एप्रिल फ्यूचर्स किमती २.९ टक्क्यांनी घसरून रु. ६,७१६ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. ६,८८० वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १.४ टक्क्यांनी अधिक आहेत. आवक वाढू लागली आहे.

Cotton Market
Chana Rate : नांदेडमध्ये हरभऱ्याच्या दरात घसरण

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात सप्ताहात ०.५ टक्का घसरून ४,७२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याच पातळीवर आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक वाढू लागली आहे.

मूग

मुगाच्या किमती फेब्रुवारी महिन्यात स्थिर होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ८,०२५ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ८,१०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी घटत आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती फेब्रुवारी महिन्यात कमी होत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) ०.९ टक्का घसरून ५,४०४ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ०.९ टक्क्याने घसरून ५,३५३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनच्या भावातील घसरण थांबलेली नाही.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.३ टक्का वाढून रु. ७,४०० वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा १.८ टक्क्याने वाढून रु. ७,५३३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे. तुरीची बाजार समितीतील सर्वाधिक साप्ताहिक आवक फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात होती; त्यानंतर जरी ती कमी झाली असली, तरी अजूनही लक्षणीय आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.) : arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com