बुडत्या शेतकऱ्याला पडत्या रुपयाचा आधार

गहू (Wheat), मक्यासारख्या (Maize) कृषिवायद्यांमध्ये चांगलीच घट झालेली दिसली. याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये झालेला एक करार. या दोन देशांमध्ये युद्ध चालूच आहे. त्यामुळे धान्याची निर्यात खोळंबली होती.
Indian Rupee
Indian RupeeAgrowon

श्रीकांत कुवळेकर

सोयाबीन, कापूस, कडधान्यांचे दर हमीभावापेक्षा (MSP) जास्त राहतील, असे आताचे अनुमान आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मागील तीन महिन्यांमध्ये रुपयाचे वेगाने झालेले अवमूल्यन. सुमारे ७५-७६ रुपये प्रति डॉलर असणारा भारतीय रुपया (Indian Rupee) आज ८० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच पुढील चार- सहा आठवड्यांमध्ये तो ८१ ते ८१.५० या पातळीवर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको.

असे झाल्यास आयातीवर अवलंबून असलेल्या तूर, खाद्यतेले, तेलबिया यांना त्याचा आधार मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे किंमती हमीभावापर्यंत येणे टाळले जाईल. मागील काही दिवसांत वाढीव उत्पादन खर्चामुळे शेती महाग झाली होती. त्यात आंतरराष्ट्रीय मंदी आल्यामुळे शेती नुकसानीत जाण्याचे संकट ओढवले होते. परंतु पडत्या रुपयामुळे ते संकट टळेल, असे सध्याचे चित्र आहे.

Indian Rupee
Compensation : झारखंडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

मागील काही आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय शेतीमाल वायदे बाजारपेठेमध्ये घसरण सुरू आहे. ती थांबण्याचे लक्षण सध्या तरी दिसत नाही. भारतातील बाजारपेठेवरदेखील त्याचा काही प्रमाणात प्रभाव दिसत आहे. अमेरिकेतील केंद्रीय बॅँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात मोठी वाढ केली आहे. सध्याची घसरण सुरू होण्यामागे ते एक प्रमुख कारण आहे.

या व्याजदरवाढीमुळे आर्थिक मंदीची चाहुल लागल्याने ही घसरण वाढली. त्यात भर म्हणून भारत आणि इंग्लंडपाठोपाठ, युरोपिअन मध्यवर्ती बँकेनेदेखील दशकात पहिल्यांदाच व्याजदरात वाढ घोषित केली. तीदेखील ०.५ टक्के इतकी मोठी. त्यामुळे बाजारातील घसरणीमध्ये अधिकच भर पडली. नाही म्हणायला रशियाने व्याजदरात कपात केल्याने शुक्रवारअखेर बाजार थोडे सांभाळले गेले.

Indian Rupee
Crop Damage : तेलंगणातील शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

असे असूनही गहू (Wheat), मक्यासारख्या (Maize) कृषिवायद्यांमध्ये चांगलीच घट झालेली दिसली. याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये झालेला एक करार. या दोन देशांमध्ये युद्ध चालूच आहे. त्यामुळे धान्याची निर्यात खोळंबली होती. त्यामुळे युद्ध सुरू असतानाही दुसऱ्या बाजूला या दोन देशांमध्ये धान्याची निर्यात खुली करण्यासाठी एक करार झाला आहे.

यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आणि तुर्कीने पुढाकार घेतला होता. या करारामुळे नजीकच्या काळातील अन्नधान्य टंचाईची काळजी तरी मिटल्याचे दिसत आहे. तसेच उत्तर गोलार्धातील काही देशांमधून गहू आणि मका याचा नवीन हंगामातील पुरवठा देखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर किमती नरम झाल्याचे म्हटले जात आहे.

Indian Rupee
Pulses: छत्तीसगडमध्ये कडधान्यांच्या सरकारी खरेदीची हमी

गहू दोन महिन्यांपूर्वी १३ डॉलर प्रति बुशेल या विक्रमी किंमतपातळीवर पोहोचला होता. तो शुक्रवारअखेरीस ७.५ डॉलरवर बंद झाला. तर मका ८.२ डॉलर वरून ५.६ डॉलरवर आला. म्हणजे गहू आणि मका त्यांच्या मे महिन्यातील शिखरावरून अनुक्रमे ४० टक्के आणि ३० टक्के एवढे घसरले आहेत. पामतेल एक वेळ ५० टक्के गडगडले होते. तर सोयाबीन आणि सोयातेल देखील २०-२५ टक्के स्वस्त झालेले दिसत आहे. कापसामध्ये (Cotton) देखील जवळपास तीच स्थिती आहे.

देशांतर्गत स्थिती महत्त्वाची

अमेरिकी बाजारातील या घसरणीशी तुलना करता भारतातील शेतीमालाच्या किमती तुलनेने खूपच कमी प्रमाणात नरमल्याचे दिसते. अपवाद सोयाबीनचा. याला अनेक कारणे आहेत. एक तर येथील बाजारामध्ये सध्या खरिपाच्या पेरण्यांमध्ये होणारे आठवड्यागणिकचे बदल, हवामानाचा लहरीपणा, सरकारी धोरणांबद्दलच्या अपेक्षा यावरून देशांतर्गत शेतीमाल बाजारपेठ ‘टाईट' दिसतेय. म्हणजे पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक अशा स्थितीकडे बाजार झुकल्याचे दिसत आहे.

Indian Rupee
Wheat Export Ban :निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना नाही: तोमर

यामुळे पुढील महिना दोन महिने तरी भारतातील शेतीमाल बाजार आंतरराष्ट्रीय संकेतांपेक्षा देशांतर्गत परिस्थितीनुसार चालेल, असे वाटत आहे. त्यामुळे देशांतर्गत स्थिती जाणून घेऊया. महिना दोन महिन्यापूर्वी हरभरा प्रति क्विंटल ४,२०० ते ४,४०० रुपये या दरम्यान होता. तो आता ४,८०० रुपयांवर पोहोचला आहे. तुरीच्या पेरण्याची ताजी आकडेवारी पाहिली असता पेरण्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के पिछाडीवर आहेत.

त्यामुळे तूर देखील चांगलीच भडकली आहे. हरभऱ्यामध्ये स्टॉकिस्ट मंडळींचा प्रवेश झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पुढील तीन महिने सणासुदीचे दिवस आहेत. हे सण कोविडमुक्त वातावरणात धुमधडाक्यात साजरे होणार असल्याने कडधान्यासहित एकंदरीत सर्वच शेतीमालाला चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे.

या सगळ्यात पावसाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नाशिक, विदर्भासारख्या भागांमध्ये अतिवृष्टी तर उत्तर प्रदेश, झारखंडसारख्या राज्यांत दुष्काळप्रवण स्थिती असे सध्याचे चित्र आहे. देशभरात पावसाचा असमतोल दिसत आहे. देशातील अनेक भागांत भात, मका यांच्या पेरण्या एक तर झालेल्या नाहीत किंवा झालेल्या पेरण्या वाया गेल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळेच मका भारतात मंदीमध्ये गेलेला नाही आणि नजीकच्या भविष्यात मंदीत जाण्यासारखी परिस्थिती नाही.

गव्हात साठवणुकीकडे कल

गव्हाबाबत बोलायचे तर सरकार देशात मुबलक गहू उपलब्ध असल्याची ग्वाही देत आहे. परंतु हजर बाजारात गहू मे मधील विक्रमी २,४०० ते २,५०० रुपये क्विंटल या दरपातळीपासून फार लांब नाही. त्यातच अमेरिकी कृषी खात्याने (यूएसडीए) भारतातील गहू उत्पादनाचा अंदाज ९९ दशलक्ष टनांवर आणला आहे. केंद्र सरकारने सुरवातीला जाहीर केलेल्या दोन सुधारित अनुमानांच्या तुलनेत यूएसडीएने गहू उत्पादन अनुक्रमे १२ दशलक्ष टन आणि ७ दशलक्ष टन कमी दाखवले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण असूनसुद्धा भारतात आज गव्हामध्ये विक्रीपेक्षा साठवणुकीकडेच व्यापाऱ्यांचा कल आहे.

हमीभावाच्या खाली घसरण नाही

दिवाळीच्या दरम्यान खरीप पिकांची काढणी सुरु होईल. त्यापूर्वीच्या महिन्याभरामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या दरामध्ये नरमाई येईल, अशी सध्याची चाल दर्शवत आहे. पामतेल आणि सोयातेल गडगडल्यामुळे त्यांची आयात खूप वाढण्याची शक्यता असल्यामुळे सोयाबीनवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर कापसाच्या बाबतीत उत्पादनावर प्रश्नचिन्ह असले तरी सर्वच उत्पादक देशांमध्ये क्षेत्रवाढीचे सुरवातीचे संकेत आहेत.

त्यामुळे या दोन्ही पिकांमध्ये सध्या असलेली नरमाई थोड्याशा वाढीनंतर परत सुरु होईल. परंतु एकंदरीत हमीभावापर्यंत किंमती गडगडण्याची शक्यता मात्र दिसत नाही. अगदी कडधान्यांमध्ये देखील तूर किंवा हरभरा आयात करण्याची वेळ आली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आणि त्यावरील लागू असलेले आयात शुल्क पाहता दर हमीभावाच्या वरच राहतील, असा प्राथमिक अंदाज आहे.

सोयाबीन, कापूस, कडधान्यांचे दर हमीभावापेक्षा जास्त राहतील, असे आताचे अनुमान आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मागील तीन महिन्यांमध्ये रुपयाचे वेगाने झालेले अवमूल्यन. सुमारे ७५-७६ रुपये प्रति डॉलर असणारा भारतीय रुपया आज ८० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच पुढील चार- सहा आठवड्यांमध्ये तो ८१ ते ८१.५० या पातळीवर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको.

असे झाल्यास आयातीवर अवलंबून असलेल्या तूर, खाद्यतेले, तेलबिया यांना त्याचा आधार मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे किंमती हमीभावापर्यंत येणे टाळले जाईल. मागील काही दिवसांत वाढीव उत्पादन खर्चामुळे शेती महाग झाली होती. त्यात आंतरराष्ट्रीय मंदी आल्यामुळे शेती नुकसानीत जाण्याचे संकट ओढवले होते. परंतु पडत्या रुपयामुळे ते संकट टळेल, असे सध्याचे चित्र आहे.

(लेखक कृषी व्यापार, कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com