हरभरा खरेदीसाठी शेतकरी आक्रमक

हरभरा खरेदीसाठी शेतकरी आक्रमक
Chana ProcurementAgrowon

नांदेड : ‘नाफेड’कडून (NAFED) जिल्ह्यात ५३ ठिकाणी सुरू असलेली हरभरा खरेदी (Chana Procurement) पोर्टल बंद झाली. त्यामुळे हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी (Online Registration For Chana Sale) करून शेतकरी खरेदी केंद्रांवर (Procurement Center) हरभऱ्याच्या गाड्या घेऊन आले आहेत. हे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. शासनाने उर्वरित शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

जिल्ह्यात नाफेड व ‘एफसीआय’कडून हमीदराने ५३ ठिकाणी हरभरा खरेदी सुरू आहे. यात महाएफपीसी, पणन महासंघ व ‘विदर्भ को-आपरेटिव्ह’कडून गावस्तरावर हरभरा खरेदी करण्यात येत आहे. प्रारंभी २९ मेपर्यंत खरेदीची मुदतहोती. परंतु ‘नाफेड’ने खरेदीचे उद्दिष्ट संपल्याचे सांगून २३ मे रोजी पोर्टल बंद केले. यानंतर लाखो क्विंटल हरभरा खरेदी शिल्लक राहिली. त्यामुळे केंद्र शासनाने हरभरा खरेदीस १८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. यानंतर सोमवारी ३० मे रोजी पोर्टल काही तासांसाठी सुरू करून बंद केले. यानंतर खरेदीची प्रक्रिया शिल्लक राहिल्याने पोर्टल गुरुवारी (ता.३) पुन्हा बंद केले. यामुळे हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर गाड्या घेऊन आलेले शेतकरी विक्रीअभावी अडकून पडले आहेत. शासनाने उर्वरित शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी दिला.

केंद्र सरकारने हरभरा खरेदीचे वाढीव टार्गेट दिले होते, ते संपल्यामुळे खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे जिल्हात २० टक्के शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे बाकी आहे. अनेक खरेदी केंद्राचा माल लॉटइंट्रीपेक्षा जास्त शासनाच्या गोडाउनला जमा झाला आहे. आता पर्याय म्हणून राज्य सरकारने शिल्लक हरभरा खरेदी करावा.
गणेश बिरू, जिल्हा समन्वयक, महाएफपीसी, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com