बीटी वांगे लागवडीसाठी किसान सत्याग्रह

जगभरात जनुकीय सुधारित वाणांना (जीएम) मान्यता देण्यात आली आहे मात्र भारतात फक्त कपाशीच्या बीजी १ व बीजी २ या जातींनाच मान्यता देण्यात आली आहे. इतर पिकांना व कपाशीच्या तणनाशक रोधक, गुलाबी बोंडअळी रोधक वाणांना मान्यता नाही. इतर पिकांमध्येही उत्पादन वाढवणार्‍या, पाण्याचा ताण सहन करणार्‍या, खारवट जमिनीत अधिक सरस उत्पादन देऊ शकणारी जनुकीय सुधारित वाणे उपलब्ध आहेत.
BT Brinjal
BT Brinjal

सरकारने जीएम पिकांना परवानगी द्यावी ही मागणी करत शेतकरी संघटना (Farmers Organisation) व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने गुरुवारी श्रीगोंदा फॅक्टरी येथे प्रतिबंधित बी.टी. वांग्याची जाहीर लागवड करण्यात आली. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

जगभरात जनुकीय सुधारित वाणांना (जीएम) मान्यता देण्यात आली आहे मात्र भारतात फक्त कपाशीच्या (Cotton) बीजी १ व बीजी २ या जातींनाच मान्यता देण्यात आली आहे. इतर पिकांना व कपाशीच्या तणनाशक रोधक, गुलाबी बोंडअळी रोधक वाणांना मान्यता नाही. इतर पिकांमध्येही उत्पादन वाढवणार्‍या, पाण्याचा ताण सहन करणार्‍या, खारवट जमिनीत अधिक सरस उत्पादन देऊ शकणारी जनुकीय सुधारित वाणे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आल्याचे घनवट म्हणाले आहेत.

व्हिडीओ पाहा -

बीटी वांग्याचे (BT Brinjal) बियाणे भारतातील कंपनीने, एका कृषी विद्यापिठाच्या (Agriculture University) सहकार्याने तयार केले आहे. भारतात या बियाण्याला बंदी आहे मात्र बांगलादेशने या बियाण्याच्या वापरास सात वर्षांपूर्वी मान्यता दिली व तेथील शेतकरी फायदा कमवत आहे. गुरुवारी श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या शेतात बीटी वांग्याची लागवड करण्याचे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो शेतकर्‍यांनी या आंदोलनात भाग घेतला. या पुर्वी शेतकरी संघटनेतर्फे अकोला जिल्हयात, तणनाशक रोधक कपाशीची लागवड करून किसान सत्याग्रह केला होता.

बीटी वांग्याबरोबर सर्व जीएम पिके घेण्याचे स्वातंत्र्य शेतकर्‍यांना मिळाल्यास शेतकर्‍यांना फायदा, ग्राहकांना रास्त दरात अन्न मिळेल व देश  समृद्ध होईल असा विश्वास यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, ललित बहाळे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी सीमा नरोडे, रामजीवन बोंदर, सतीश दाणी, सुधीर बिंदू, मधूसूदन हरणे, विजय निवल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com