Chana Market : हरभऱ्याचे घाटेच भरले नाही; उत्पादकता घटल्याचा शेतकऱ्यांचा दावा

देशातील अनेक भागांमध्ये सध्या हरभरा काढणी सुरु झाली. सरकारने यंदा देशात विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला.
Chana Market
Chana Market Agrowon

Chana Rate : देशात यंदा विक्रमी हरभरा उत्पादन (Chana Production) होईल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. त्यामुळं बाजारावर दबाव आहे. पण हरभरा काढणी (Chana Harvesting) जसजशी होत आहे, तशी उत्पादनातील घट स्पष्ट होत आहे.

यंदा बदलत्या वातावरणाचा हरभरा पिकाला फटका बसला. काही भागात घाट्यांमध्ये दाणे कमी भरले. तर काही ठिकाणी घाट्यांची संख्याच कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

देशातील अनेक भागांमध्ये सध्या हरभरा काढणी सुरु झाली. सरकारने यंदा देशात विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. पण हरभरा उत्पादकता घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक २९ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली.

पण मराठवाडा आणि विदर्भ या महत्वाच्या हरभरा उत्पादक विभागांमध्ये यंदा उत्पादकता कमी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचंही काही शेतकऱ्यांनी कळवलं.

त्यामुळं यदा हरभरा उत्पादनाचा सरकारचा अंदाज चुकणार, असे व्यापारी आणि उद्योग सांगत आहेत. हरभऱ्याच्या काही घाट्यांमध्ये दाणा भरला नाही. त्यामुळं उत्पादन घटल्याचे अकोला जिल्ह्यातील निंभोरा येथील शेतकरी गणेश नानोटे यांनी सांगितले.

Chana Market
Chana Procurement : अनेक संस्थांचे पोर्टल अद्याप बंदच

सध्या हरभरा दराचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चीला जात आहे. तसं पाहिलं तर सध्या हरभरा आवक खूपच कमी आहे. त्यामुळं खुल्या बाजारात दर हमीभावाच्या दरम्यान असयला हवेत. पण नाफेडच्या विक्रीमुळं हरभरा दरावर दबाव आला.

गेल्या हंगामात देशात १३५ लाख टन हरभरा उत्पादन झाले. नाफेडने यापैकी १७ टक्के हरभरा खेरदी केला. नाफेडकडे हरभऱ्याचा २७ लाख टनांपर्यंत स्टाॅक झाला होता. हा स्टाॅक नाफेड गेले वर्षभर टप्याटप्याने बाहेर काढत आहे.

तसेच हा हरभरा कमी दरात विकला जात आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील दर दबावात आले.सध्या हरभऱ्याला ४ हजार २०० रुपयांपासून दर मिळत आहेत, असे जालना जिल्ह्यातील विरेगाव येथील शेतकरी विठ्ठल कदम यांनी सांगितले.

सध्याची दरपातळी

सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार २०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले.

पण देशात १५ मार्चपासून नाफेडची हरभरा खरेदी सुरु होणार आहे. नाफेड किती हरभरा खरेदी करणार याची आकडेवारी अद्याप आली नाही.

पण उत्पादनात दिसणारी घट आणि नाफेडच्या खरेदीचा हरभरा दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana Market
Chana Procurement : हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढवा, नोंदणीस मुदवाढ द्या
हरभऱ्याचा उतारा यंदा कमी आला. त्यातच बाजारात हंगामाच्या सुरुवातीलाच भाव कोसळले. बाजारात हरभऱ्याला ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपये भाव मिळत आहे. नाफेडची नोंदणी सुरु आहे. खरेदी १५ मार्चपासून सुरु होईल. पण ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कमी दरात खुल्या बाजारात विक्री करत आहेत.
विठ्ठल कदम, शेतकरी, विरेगाव, जि. जालना
यंदा बदलत्या वातावरणाचा हरभरा पिकाला फटका बसला. हरभऱ्याच्या शेंट्यावरील घाट्यांना दाणे भरलेच नाही. आमच्या भागात कमी अधिक प्रमाणात ही स्थिती दिसते. उत्पादन जवळपास २० टक्क्यांपर्यंत घटलेले दिसते.
गणेश नानोटे, शेतकरी, निंभोरा, जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com