शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दहापटीने वाढ; तोमर

‘किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. २०१६ ते २०२२ दरम्यान देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढीचे उद्दिष्ट केंद्रातील भाजप सरकारने ठेवले होते.
Farmers Income
Farmers IncomeAgrowon

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात केवळ दुप्पट नव्हे तर दसपट वाढ झाली असल्याचा दावा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केला आहे. आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन जागृती करायला हवी, ज्यामुळे सगळ्याच शेतकऱ्यांना आपला आर्थिक विकास साध्य करता येईल, असेही तोमर म्हणाले आहेत.

'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी' मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. २०१६ ते २०२२ दरम्यान देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढीचे उद्दिष्ट केंद्रातील भाजप सरकारने ठेवले होते.

Farmers Income
महागाई रोखण्यात आरबीआयला अपयश!

सरकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी संबंधित योजनांशी संबंधित शेतकरी समृद्ध झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली आहे. पाच ते सहा वर्षांत अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन ते दहा पटीने वाढले आहे. या शेतकऱ्यांनी कृषी दूत म्हणून गावोवागी जाऊन इतर शेतकऱ्यांचे प्रबोधन केले तर शेतीचे अर्थकारण (Agriculture Economy)बळकट होईल, असा विश्वास पीक विमा संपर्क अभियानात संबोधित करताना तोमर यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या (Farmer) उत्पादनांना बाजारातील किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) चांगला भाव मिळत आहे. गहू व मोहरीला चांगला भाव मिळत आहे. मोहरीच्या तेलातील भेसळ बंद झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या हिताची अशी इतर पावलेही सरकार उचलणार असल्याचे तोमर म्हणाले आहेत.

Farmers Income
हे वर्ष खाद्यान्न महागाईचेच !

ग्रामीण भागात कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एक लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी आठ हजार कोटींचे प्रकल्प मंजूर झाले. साठवणूक व इतर सुविधांचा विकास करण्यात येणार आहे, सरकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी संबंधित कल्याणकारी योजनांमुळे शेतकरी समृद्ध झाले असून त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली आहे.

पाच ते सहा वर्षांत अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन ते दहा पटीने वाढले असल्याचा दावाही तोमर यांनी केला आहे. देशभरात नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. आजमितीस देशभरात ३८ लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती केली जात असून शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होत असल्याचे तोमर म्हणाले आहेत.

Farmers Income
भातपिकाच्या हंगामात पंजाबला हवा आहे सलग वीजपुरवठा

रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीतील पोत बिघडला आहे, सेंद्रीय कार्बनचे प्रमाण घटले आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांच्या पुरवठ्यासाठी देशाला आयातीवर निर्भर रहावे लागते, त्यामुळे पर्यायी खतांच्या वापराला प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही तोमर म्हणाले आहेत.

एकेकाळी देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. हरितक्रांतीची सुरुवात झाली आणि रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. हरितक्रांती यशस्वी करण्यात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश यांनी मोठे योगदान दिले होते. आता देशात आवश्‍यकतेपेक्षा जास्त अन्नधान्य उत्पादन होत असून बागायती पिकांचे विक्रमी उत्पादन होत आहे, असेही कृषिमंत्री तोमर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com