दुधाला ‘आरएसएफ’प्रमाणे दर द्या

शेतकरी संघटनांची राज्य सरकारकडे मागणी
दुधाला ‘आरएसएफ’प्रमाणे दर द्या
Milk RateAgrowon

बारामती : बारामती दराच्या प्रश्नांवरून राज्य सरकारने दुधाला एफआरपी (Milk FRP) लागू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. एफआरपीच्या या मुद्द्यावर शेतकरी संघटनेने (Shetkari Sanghatana) मात्र आक्षेप घेतला आहे. एफआरपीऐवजी आरएसएफ(RSF), महसुली उत्पन्नातील वाटणीप्रमाणे दुधाला दर (Milk Price) द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

Milk Rate
दूध दर पाडणाऱ्या दूध  संघ, कंपन्यांचे ऑडिट करा ः किसान सभा 

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी एफआरपी (उचित आणि लाभदायक किंमत) याला विरोध करायला हवा. ऊस कारखानदारीतील नफेखोरीप्रमाणेच दूध संस्थासुद्धा यामुळे नफेखोरी करू लागतील. कायदेशीर बाबींप्रमाणे आरएसएफप्रमाणे दूध उत्पादकांचा उत्पन्नातील वाटा ठरला पाहिजे. दूध आणि दुधापासून जे फस्ट प्रॉडक्ट तयार होतात, त्यातील ७० टक्के रक्कम ही कच्चा उत्पादकाला मिळायला हवी. उर्वरित ३० टक्क्यांमध्ये दूध संस्थांनी भागवले पाहिजे.’’

एफआरपीच्या चर्चेमुळे जी परिस्थिती ऊस शेतीची झाली आहे. तीच परिस्थिती दूधधंद्याची होण्याची शक्यता आहे. आरएसएफनुसार दुधाचा दर बाजारातील किमतीप्रमाणे ठरवणे गरजेचे आहे. ग्राहक ६० रुपये लिटरने दूध विकत घेत आहे.

ऊस कारखानदारीची जी सध्याची अवस्था आहे तशीच अवस्था दूधव्यवसायाची भविष्यात होईल. केवळ नफा कमविण्यासाठी दूध उत्पादकाला एफआरपीचे गाजर दाखवून दूध संस्थांच्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे. दूध उत्पादकाला कमीत कमी मोबदला देऊन त्याला लुटण्याचा हा प्रकार आहे.
रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना
शेतकरी संघटना उसाला एफआरपी लागू केली. त्यानंतर बहुतांश कारखाने उसाची एफआरपी कमी देण्यासाठी रिकव्हरी चोरायला लागले. ऊस कारखानदारीमधील सव्वातीन टक्के रिकव्हरी राज्य शासनाने नियम करून चोरली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला प्रतिटन १ हजार रुपयांचा तोटा झाला. दुधाला एफआरपी लागू केल्यास भविष्यात दुधाचे फॅट व एसएनएफचा रेपोमध्ये बदल केला जाईल. हा खूप मोठा धोका आहे.
पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com