Fertilizer : खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी

रासायनिक खतांच्या किमतीत दोन महिन्यांत शंभर ते अडीचशे रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत करणारी आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

चिपळूण (जि. रत्नागिरी) ः रासायनिक खतांच्या किमतीत (Chemical Fertilizer Rate) दोन महिन्यांत शंभर ते अडीचशे रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत करणारी आहे. खतांच्या दरवाढीमुळे (Fertilizer Rate) शेतकरी नाराज झाला असून, जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत केंद्र शासनाकडे आवाज उठवावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. चिपळूण तालुक्यात मागणीप्रमाणे खते उपलब्ध (Fertilizer Availability) झालेली नाहीत.

Fertilizer
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

सुरुवातीपासूनच ही ओरड असताना टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा सुरू आहे; मात्र आता बाजारात खतांची किंमत वाढल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. मागील दोन दिवस पावसाने चांगली उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पिकांना खते देण्याचे काम सुरू केले आहे. खते घेताना सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या आढळून आल्या. त्यातच केंद्र शासनातर्फे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली.

Fertilizer
खते, बियाणे दुकानात 'कृषी'कडून तपासणी

जिल्ह्यात सुपर फॉस्फेटची एक बॅग जून महिन्यात ५०० रुपयांना मिळत होती. ती जुलै महिन्यात ६०० रुपयांवर गेली. १०ः२०ः२० हे खत गतवर्षी १२५० रुपयांना मिळत होते. ते यंदा १४७० ला मिळत आहे. पोटॅश एक हजार रुपयांना मिळत होते ते १७०० रुपयांना मिळत आहे. १५ः१५ः१५ खत ११५० ला मिळत होते ते आता १४७० ला मिळत आहे. याबाबत अनारी (ता. चिपळूण) येथील शेतकरी विलास शिगवण म्हणाले, सुपर फॉस्फेटच्या दरात दोनच महिन्यांत शंभर रुपयांची अचानक वाढ करण्यात आली आहे. अजून या किमतीत वाढ होईल, असे बियाणे विक्रेते सांगत आहेत. खरिपाचा हंगाम सुरू असून, आता खतांची नितांत गरज आहे. अशावेळी किमती वाढवणे शेतकऱ्यांना महागाईच्या खाईत ढकलण्यासारखे आहेत.

रासायनिक खतांच्या दरवाढीच्या तक्रारी आल्या आहेत; मात्र त्यावर नियंत्रण केंद्र शासनाचे आहे. खतांच्या किमतीबाबत शेतकऱ्यांच्या नाराजीची माहिती मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्राकडे खत दरवाढीसंदर्भात पाठपुरावा करणार आहे.
शेखर निकम, आमदार, चिपळूण

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com