Sugar Export
Sugar Export|Agrowon
ॲग्रोमनी

शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटी

साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटींच्या पुढे

टीम अॅग्राेवन

पुणे ः राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या (२०२१-२२) ऊस गाळप हंगामात (Sugar Season) विक्रमी गाळप (Record Sugarcane Crushing) करीत देदीप्यमान वाटचाल केली आहे. यामुळे साखर उद्योगाची (Sugar Industry) उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’पोटी (FRP) ४२ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

यंदा २०० साखर कारखान्यांनी एकूण १३२०.३१ लाख टन उसाची खरेदी (Sugarcane Procurement) केली. त्याचे गाळप करून १३७.२८ लाख टन साखर (Sugara Production) तयार केली आहे. सरासरी साखर उतारा १०.४० टक्के मिळाला आहे. सरासरी १७३ दिवस गाळप हंगाम चालला. जास्तीत जास्त गाळप दिवस २४०, तर किमान गाळप दिवस ३६ राहिले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे पदाधिकारी, प्रशासन, कर्मचारी, ऊसतोडणी मजूर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

साखर कारखान्यांची उलाढाल एकदम वाढल्याने शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांची एफआरपी सुरळीतपणे मिळत आहे. कारखान्यांनी यंदा इथेनॉलमध्ये ९ हजार कोटींची, सहविजेत सहा हजार कोटींची, तर मद्यनिर्मितीतून १२ हजार कोटीची उलाढाल केली आहे. यंदा पावणेपंचवीस लाख टन ऊसगाळप करीत माढा येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप करण्याचा मान मिळविला. साडेपंचवीस लाख क्विंटल इतकी विक्रमी साखरदेखील याच कारखान्याने तयार केली.

कागलच्या ‘दूधगंगा ससाका’ने १२.९९ टक्के इतका साखर उतारा मिळविला. तो राज्यात सर्वाधिक आहे. सर्वांत कमी गाळप ‘किसनवीर ससाका’ने (ता. वाई) केले. ते १८ हजार टनांच्या आसपास आहे. सर्वांत कमी उतारा उस्मानाबादच्या जयलक्ष्मी शुगर्स कारखान्याला मिळाला. तो अवघा ५.९० टक्के आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३७ हजार कोटींपेक्षा जास्त एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र १८६९ कोटी रुपये थकीत असून, ही टक्केवारी अवघी ४.७२ टक्के आहे.


उलाढाल एक लाख कोटींच्या पुढे
उलाढालीचे क्षेत्र...एकूण उलाढाल (कोटींत)
शेतकऱ्यांना एफआरपी...४२०००
इथेनॉल...९०००
सहवीज...६०००
रेक्टिफाइड स्पिरीट...५०००
मद्यविक्री...१२०००
रसायने...१०००
बगॅस...५००
मळी...४०००
कामगारांचे पगार...६००
नवीन यंत्रे खरेदी व उभारणी...६०००
साखरनिर्यात...३००
कार्बन डायऑक्साइड...१
बायोसीएनजी...१
सौर प्रकल्प...२
खांडसरी...७१५
राज्य जीएसटी कर भरणा...१५००
केंद्रीय जीएसटी कर भरणा...१५००
राज्य उत्पादन शुल्क...३०००


...असा झाला हंगामाचा गोड शेवट
विभाग- यंदा हंगाम घेणारे कारखाने-प्रतिदिन गाळपक्षमता (टनांत)-गाळप (लाख टनांत)–साखर उत्पादन (लाख क्विंटल)-साखर उतारा—बंद झालेले कारखाने -सहकारी–खासगी—एकूण
कोल्हापूर-२६-१०-३६-१९०८००-२५४.६९-३००.४१-११.८-३६
पुणे-१७-१३-३०-१५०२००-२६९.८७-१९१.२९-१०.७९-२९
सोलापूर-१७-३०-४७-१८०६००-३००.६८-२८४.३४-९.४६-४७
अहमदनगर -१८-१०-२८-१११५००-२००.४३-२००.७५-१०.०२-२८
औरंगाबाद-१४-११-२५-७६८५०-१३२.८३-१२९.२७-९.७३-२४
नांदेड-९-१८-२७-७४३००-१४७.०८-१५३.२२-१०.४२-२७
अमरावती-०-३-३-५८००-१०.०३-९.६७-९.६४-३
नागपूर-०-४-४-८७५०-४.५५-३.८२-८.४-४
एकूण-१०१-९९-२००-७९८८०-१३२०.१६-१३७२.७७-१०.४-१९८
मागील हंगामात-९४-९६-१९०-७८००००-१०१३.६४-१०६४.०८-१०.५-१९०


जिल्हानिहाय ऊसगाळप
जिल्हा-कारखाने संख्या-एकूण गाळप-साखर उत्पादन-साखर उतारा-सरासरी गाळप दिवस
सोलापूर-३३-२२९.७२-२१६.३९-९.३३२-१७२
अहमदनगर-२३-१८५.२९-१८५.२३-१०.०४-१९०
कोल्हापूर-२३-१६०.७७-१९३.०३-११.९९-१३५
पुणे-१६-१५४.४९-१६४.८९-१०.६०-१८४
सातारा-१४-११५.३८-१२६.४०-१०.३८-१७५
सांगली-१३-९३.९२-१०७.३९-११.४७-१६१
उस्मानाबाद-१४-७०.९६-६७.९५-९.१९-१७१
लातूर-१०-५९.७९-६३.६१-१०.४०-१९५
बीड-७-४७.१२-४०.९५-८.८७-१८५
परभणी-६-४०.५४-४२.२०-१०.४१-२०५
जालना-५-२८.९९-३०.३८-१०.३८-२०८
औरंगाबाद-७-२८.६७-२९.९१-१०.०५-१८८
नांदेड-६-२५.३१-२४.७९-९.७५-१७५
हिंगोली-५-२१.४८-२२.६६-१०.४१-१८६
नंदुरबार-३-१८.३६-१८.१३-९.८३-१८२
नाशिक-५-१५.२५-१५.४९-९.९३-१४०
जळगाव-३-९.६९-९.९०-९.८३-१७२
यवतमाळ-२-९.२०-८.९२-९.४६-१७०
वर्धा-१-१.५२-१.१३-७.३९-१७९
भंडारा-१-१.५२-१.३३-८.७४-१४३
नागपूर-२-१.५१-१.३६-८.२८-८६-८६
बुलडाणा-१-०.८२-०.७५-९.१२-५९-५९
एकूण-२००-१३२०.३२-१३७२.७९-१०.४०-१७३


साखर कारखानदारीची यशाची चढती कमान
हंगाम वर्ष-ऊस लागवड-गाळप क्षमता-हंगाम घेणारे कारखाने-हंगामाचे एकूण दिवस
२०२१-२२-१३.६९-९.०५-८.०१-२००-१७३
२०२०-२२-११.४२-८.६०-७.२८-१९०-१४०
२०१९-२०-८.२२-८.३९-५.६५-१४७-१२७
२०१८-१९-११.६२-८.३९-७.३७-१९५-१४२
२०१७-१८-९.०२-७.९८-६.६८-१८८-७२
२०१६-१७-६.३३-७.१९-५.०७-१५०-१२६
२०१५-१६-९.८७-७.०७-५.९-१७७-१५०
२०१४-१५-९.३७-६.०९-४.६३-१५७-१२८
२०१३-१४-९.३७-६.०९-४.६३-१५७-१२८
२०१२-१३-९.६४-५.९९-४.८९-१७०-१४५
(लागवड क्षेत्र लाख हेक्टरमध्ये तर स्थापित गाळप क्षमता प्रतिदिन लाख टनांत आहे.)


राज्यात सर्वाधिक गाळप करणारे कारखाने
जिल्हा-कारखाना-केलेले गाळप (टनांत)
सोलापूर-''विठ्ठलराव शिंदे ससाका’, माढा -२४७८९२२
सातारा-गुरू कमोडिटी, कोरेगाव (जरंडेश्‍वर)-१९९८३३०
अहमदनगर-इंडिकॉन डेव्हलपर्स, कर्जत (अंबिका शुगर)-१९५११६०
कोल्हापूर- ‘जवाहर शेतकी ससाका’, हातकणंगले-१९०७२९८
पुणे-बारामती अॅग्रो, इंदापूर -१५२६९१६
अहमदनगर- ‘ज्ञानेश्‍वर ससाका’, नेवासा-१६५९४७०
अहमदनगर- ‘भाऊसाहेब थोरात ससाका’, संगमनेर -१५३२३६०
पुणे-माळेगाव ससाका, बारामती-१५२१२२०
अहमदनगर-मुळा ससाका, नेवासा-१५२१२२०
नगर-गंगामाई इंडस्ट्रीज, शेवगाव- १४०४१७७


राज्यात सर्वाधिक साखर तयार करणारे कारखाने
जिल्हा-कारखाना-उत्पादित साखर (क्विंटलमध्ये)
सोलापूर- ‘विठ्ठलराव शिंदे ससाका’, माढा -२३४५०००
सातारा-गुरू कमोडिटी, कोरेगाव (जरंडेश्‍वर)-२३१३०००
अहमदनगर-इंडिकॉन डेव्हलपर्स, कर्जत (अंबिका शुगर)-२१००६५०
पुणे-माळेगाव ससाका, बारामती-१७३९२००
अहमदनगर- ‘ज्ञानेश्‍वर ससाका’, नेवासा-१६९९०००
सातारा-सह्याद्री ससाका, कराड-१६९२७००
अहमदनगर- ‘भाऊसाहेब थोरात ससाका’, संगमनेर -१६१७२३०
पुणे-बारामती अॅग्रो, इंदापूर -१६०१६००
कोल्हापूर-दत्त शिरोळ ससाका, शिरोळ -१५६५५००


राज्यात सर्वाधिक साखर उतारा घेणारे कारखाने
जिल्हा-कारखाना-उतारा टक्केवारी
कोल्हापूर-दूधगंगा वेदगंगा ससाका, कागल-१२.९९
कोल्हापूर-पंचगंगा ससाका, हातकणंगले (रेणुका शुगर्स) - १२.९०
सातारा- सह्याद्री ससाका, कराड - १२.६६
सांगली-राजारामबापू पाटील ससाका, वाळवा-१२.६५
सांगली-सोनहिरा ससाका, कडेगाव- १२.५४
कोल्हापूर-अथणी शुगर्स, भुदरगड-१२.५१
कोल्हापूर-ओलम अॅग्रो, चंदगड- १२.५१
कोल्हापूर- कुंभी कासारी ससाका, करवीर- १२.४४
कोल्हापूर- इको केन एनर्जी, चंदगड - १२.३८


शेतकऱ्यांना केले ९५ टक्के ‘एफआरपी’चे वाटप
(आकडेवारी ३१ मे २०२२ अखेरची स्थितीनुसार)
ऊस विकत घेणारे कारखाने - १९९
विकत घेतलेला ऊस- १३०२.७२ लाख टन
एफआरपीप्रमाणे देय रक्कम-३९ हजार ५८२ कोटी ३२ लाख रुपये
एफआरपीप्रमाणे अदा केलेली रक्कम-३७ हजार ७१२ कोटी ३६ लाख रुपये
एफआरपीची थकीत रक्कम- एक हजार ८६९ कोटी ९६ लाख रुपये
१०० टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या- ६५
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांची संख्या- १३४
आरआरसी केलेल्या कारखान्यांची संख्या - ४


उसाला सर्वाधिक भाव देणारे कारखाने
कारखान्याचे नाव- प्रतिटन देय भाव (रुपयांत)
‘दूधगंगा वेदगंगा ससाका’, कागल- ३१३३.३५
‘राजाराम बापू पाटील ससाका’, वाळवा युनिट ३- ३०४४.२३
भोगावती ससाका, करवीर -३०४३.७३
पंचगंगा ससाका, हातकणंगले (रेणुका शुगर्स) -३०३८.००
सोनहिरा ससाका, कडेगाव - २९७७.६२
कुंभी कासारी ससाका, करवीर- २९७१.६२
‘राजाराम बापू पाटील ससाका’, वाळवा युनिट २- २८८८.९७
रयत ससाका, कराड (अथणी शुगर्स) -२८८२.२०
‘पद्मश्री डी. वाय. पाटील ससाका’ -२८६५.८६
‘सदाशिवराव मंडलिक ससाका’, कागल -२८६४.१९

२६४ कोटी लिटर्स इथेनॉलनिर्मितीची क्षमता तयार
राज्यातील साखर कारखाने इथेनॉलनिर्मितीकडे वळाले. देशात १०८५ तर राज्यात १२८ कारखान्यांनी आसवनी प्रकल्प उभारले, राज्यात वर्षाला इथेनॉल तयार करण्याची क्षमता आता २६४ कोटी लिटर्सपर्यंत गेली, सहकारीप्रमाणेच खासगी साखर कारखान्यांनीही नवे आसवनी प्रकल्प उभारले किंवा विस्तारीकरण केले, कारखान्यांनी इथेनॉल पुरवताच २१ दिवसांत तेल कंपन्यांकडून पेमेंट, गेल्या हंगामातील एकूण इथेनॉल प्रकल्प ११२ (त्यात ४२ सहकारी, ३५ खासगी, ३५ स्वतंत्र) असून निर्मिती २०६ कोटी लिटर्सपर्यंत झाली आहे.

इथेनॉलपासून मिळणार पावणेआठ हजार कोटी रुपये
इथेनॉलचे स्रोत- निर्मिती- दर- विक्रीतून मिळणारी किंमत
सी-हेवी मळीपासून- २०-४६.६६-९३३.२०
बी-हेवी मळीपासून- ८०- ५९.०८-४७२६.४०
ऊस रस, साखर, साखरपाक- ३४- ६३.४५-२१५७.३०
(निर्मिती कोटी लिटर्समध्ये, दर प्रतिलिटर रुपयात, विक्री किंमत कोटी रुपयांमध्ये)

सहवीज निर्मितीतून मिळाले २४२८ कोटी रुपये
केलेली वीजनिर्मिती- ६७५.५७ कोटी युनिट्स
निर्यात वीज- ३८४.३० कोटी युनिट्स
कारखान्यांनी वापरलेली वीज- २१२.९९ कोटी युनिट्स
राज्यातील सहकारी वीजनिर्मिती प्रकल्प-६२
सहकारी वीजनिर्मिती क्षमता-१२३७.९ मेगावॉट
कार्यान्वित सहकारी प्रकल्प-६०
उभारणी चालू असलेले सहकारी प्रकल्प-२
राज्यातील खासगी वीजनिर्मिती प्रकल्प-६०
खासगी वीजनिर्मिती क्षमता-९९५.८५ मेगावॉट
कार्यान्वित खासगी प्रकल्प-५९
उभारणी चालू असलेले खासगी प्रकल्प-१

२५ हजार टनांनी गाळप क्षमता वाढविणार
आगामी गाळप हंगामाच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करण्यात आली आहे. आगामी गाळपाकरिता प्रतिदिन गाळपक्षमता २५ हजार टनांनी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. ऊस लागवडीच्या नोंदीसाठी अॅप्लिकेशनची निर्मिती केली जाणार आहे. ई-पीक पाहणीद्वारे सातबारा उतारावर ऊस नोंदीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. हंगाम लवकर सुरू करून हार्वेस्टरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com