fertilizer news: युरिया उत्पादन वाढीसाठी सरकारचा पुढाकार

युरियाची आयात ८० टक्क्यांनी कमी करून अतिरिक्तउत्पादन निर्यात करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिल्याने खतांचा वापर कमी होईल. तसेच नॅनो युरियाचा वापर वाढेल, असे सरकारने म्हटले. देशातील युरिया उत्पादन वाढविण्यासाठी सरकार खत प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करणार आहे.
Urea
Urea

पुणेः भारताला दरवर्षी जवळपास १०० लाख टन युरिया (Urea) आयात करावा लागतो. त्यामुळे आयातीवरील (Import) अवलंबित्व कमी करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यासाठी देशातील खत प्रकल्प (Fertilizer project) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास युरियाची गरज तर भागेलच, शिवाय निर्यातही (Export) करावी लागेल. 

भारत खतासाठी आयातीवर अवलंबून आहे. देशात युरियाची वार्षिक गरज ३३० ते ३३५ लाख टनांच्या दरम्यान आहे. २०१९-२० मध्ये युरियाचा वापर ३३५ लाख टन झाला. त्यापैकी आयात ९२ लाख टनांची होती. तर मागील आर्थिक वर्षात ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ३१८ लाख टनांची मागणी होती. यापैकी ९८ लाख टन युरिया आयात झाला. मात्र मागील वर्षापासून खतांच्या किमती वाढल्या. चीनने मागील वर्षी युरिया निर्यात बंद केली. तसेच इतर देशांतूनही युरिया मिळण्यात अडचणी येत आहेत. याचा फाटका भारताला बसत आहे. त्यामुळे देशातच युरिया उत्पादन वाढण्याचे उद्दीष्ट सरकारे ठेवले. हे ही वाचाः मूळ प्रश्नाला कोण भिडणार?

 युरियाची आयात ८० टक्क्यांनी कमी करून अतिरिक्त उत्पादन निर्यात करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिल्याने खतांचा वापर कमी होईल. तसेच नॅनो युरियाचा वापर वाढेल, असे सरकारने म्हटले. देशातील युरिया उत्पादन वाढविण्यासाठी सरकार खत प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करणार आहे. या उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील प्रकल्पाचाही समावेश केला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प कार्यान्वीत केला. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास वार्षिक उत्पादन १२.७ लाख टन होईल. तर तेलंगणातील रामागुंडम प्रकल्प जून महिन्यात सुरु होईल. या प्रकल्पाची क्षमताही १२.७ लाख टन आहे. तर याच क्षमतेचे आणखी दोन प्रकल्प सुरु कार्यान्वित होईल. यात झारखंडमधील सिंद्री आणि बिहारमधील बरौनी प्रकल्प येतो.    

सरकारी प्रकल्पांबरोबरच खासगी प्रकल्पही सुरु होणार आहेत. राजस्थानातील कोटा येथे आणि पश्चिम बंगालमधील पनागड येथे हे प्रकल्प होतील. या प्रकल्पांची क्षमता २६ लाख टनांची आहे. हे प्रकल्प जून महिन्यात सुरु होणार आहेत. त्यानंतर देशातील युरिया उत्पादन ३१८ लाख टनांवर पोचेल. मागील वर्षी देशात २४० लाख टन उत्पादन झाले होते. तर देशाची गरज ३३० लाख टनांची आहे. तसेच सरकार आणखी दोन प्रकल्प सुरु करणार आहे. असे झाल्यास देशातील युरिया उत्पादन ३४० लाख टनांवर पोचेल. अतिरिक्त युरिया देशाला निर्यात करावा लागेल.   हे ही वाचाः रशियाने थांबवली खतांची निर्यात

युरियाचा वापर कमी होण्याची शक्यता देशातील काही जाणकारांच्या मते नैसर्गिक शेती आणि नॅनो युरियामुळे अतिरिक्त उत्पादन होऊ शकते. खत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास उत्पादन वाढेल. तसेच सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होईल. नॅनो युरिचा वापर वाढवरही दाणेदार युरियाची मागणी कमी राहिल, असे या जाणकारांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com