Fertilizer : नेपाळमध्ये खतांचा तुटवडा; भारताकडून खरेदी करणार

नेपाळमध्ये पीक कापणीच्या हंगामात खतांचा तुटवडा भासत असून, त्यामुळे अन्नधान्याची उपलब्धता आणि उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
Fertilizer : नेपाळमध्ये खतांचा तुटवडा; भारताकडून खरेदी करणार

काठमांडू, नेपाळ (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये पीक कापणीच्या हंगामात (Crop Harvesting Season) खतांचा तुटवडा (Fertilizer Shortage) भासत असून, त्यामुळे अन्नधान्याची उपलब्धता आणि उत्पादन (Low Production) कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेपाळ सरकार भारताकडून खत खरेदी (Fertilizer Buying) करण्याचा प्रयत्न करत आहे.

राजधानी काठमांडूच्या आजूबाजूच्या उताराच्या प्रदेशात भाताची रोपे लावण्यासाठी आपले शेत तयार करण्यात व्यग्र असलेले शेतकरी गोपाळ काफले यांनी सांगितले, की तुटवड्यामुळे किंमत वाढण्याआधीच खतांची गरज काही प्रमाणात भरून काढल्याने तुटवड्याचे संकट सध्यातरी दूर झाले आहे. मला या वर्षीही खते वेळेवर मिळू शकली नाहीत. त्याचा तीव्र तुटवडा आहे. मागच्या वेळी मी पोती खरेदी केली तेव्हा त्याची किंमत २,६०० नेपाळी रूपी होती, खतांच्या तीव्र टंचाईमुळे आता ती ३,२०० रुपीवर गेली आहे. पीक कापणीच्या हंगामात खतांचा तीव्र तुटवडा असल्याने, हंगामातील कापणी आणखी कमी होऊन उत्पादनात घट होऊन अन्नधान्य टंचाई भासण्याची आणि महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Fertilizer : नेपाळमध्ये खतांचा तुटवडा; भारताकडून खरेदी करणार
खते, बियाणे दुकानात 'कृषी'कडून तपासणी

या हिमालयीन राष्ट्राच्या अर्थ व्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे २५ टक्के आहे आणि यातून नेपाळमधील सुमारे ६० टक्के कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो. परंतु गरजेच्या वेळी खतांची तुटलेली पुरवठा साखळी आणि काळाबाजार यामुळे विकासदर मंदावण्याबरोबरच मोठी चलनवाढ संभाव्य मंदीला कारणीभूत ठरते. १३ जून रोजी प्रतिनिधी सभेच्या बैठकीदरम्यान, सभागृहाचे अध्यक्ष, अग्नि सपकोटा यांनी सरकारला खतांच्या तुटवड्याच्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे निर्देश दिले. शेती मालाचे उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते अत्यंत आवश्यक आहेत आणि धान- प्रमुख नगदी पिकाच्या लागवडीदरम्यान, त्याची कमतरता निर्माण झाली असल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. कृषी क्षेत्रातील समस्यांवर उपायांना प्राधान्य द्यावे आणि सर्व संभाव्य उपाययोजना करून आवश्यक खते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश प्रतिनिधी सभेने नेपाळ सरकारला दिले. किमती वाढल्यामुळे सरकारी कंपन्या वेळेवर आयात करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर भारतासोबतच्या करारांतर्गत खत खरेदी करण्यासाठी नेपाळ सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.

Fertilizer : नेपाळमध्ये खतांचा तुटवडा; भारताकडून खरेदी करणार
Fertilizer : रासायनिक कंपन्यांनी सेंद्रिय खते पुरवावीत

कापणीच्या हंगामात खताची गरज लक्षात घेऊन, करारांतर्गत या आर्थिक वर्षात भारतातून एकूण १ लाख ५० हजार टन खतांची खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. खरेदी सुरक्षित ठेवण्यासाठी, नेपाळ सरकारने कृषिसमग्री कंपनी लिमिटेड आणि भारताने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर लिमिटेडची नियुक्ती केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून, खरेदी सुरक्षित करण्यासाठी करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, असे कृषी आणि पशुधन विकासमंत्री महेंद्र राय यादव यांनी सभेला सांगितले होते.

१५ अब्ज रुपयांची तरतूद

कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाच्या अंदाजानुसार खताची वार्षिक मागणी सुमारे ६ लाख टन आहे. नेपाळ सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, एका वर्षात खतांच्या किमती चार ते पाच पटीने वाढल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला अनुदानासाठी ७० अब्ज रुपयांपेक्षा जास्त रक्कम लागेल. रासायनिक खत आयातीसाठी सरकारने १५ अब्ज रुपयांची तरतूद केली होती. परंतु सध्याच्या किमतीनुसार, ही रक्कम केवळ २ लाख टन खरेदी करण्यासाठी पुरेशी असेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com